Join us  

उमेश यादव काउंटी चॅम्पियनशिपमध्ये MCCCकडून खेळणार; क्लबने केली घोषणा 

इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट क्लबने Middlesex Cricket भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवसोबत करार केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 6:07 PM

Open in App

नवी दिल्ली : काउंटी क्रिकेट क्लबने Middlesex Cricket भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवसोबत करार केला आहे. त्यामुळे उमेश यादव आता २०२२ च्या उर्वरीत हंगामात या क्लबकडून खेळताना दिसणार आहे. उमेश यादव काउंटी चॅम्पियनशिप व्यतिरिक्त इंग्लिश एकदिवसीय चषकासाठी देखील MCCCकडून खेळेल. भारतीय वेगवान गोलंदाज सुरूवातीला व्हिसामुळे MCCCच्या संघाचा हिस्सा झाला नव्हता, ज्याचा सामना वुस्टरशायरविरूद्ध होणार होता. मात्र आता त्याचा व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. 

दरम्यान, ३४ वर्षीय उमेश यादव प्रथम श्रेणी आणि लिस्ट-ए या दोन्ही प्रकारांमध्ये क्लबचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपलब्ध असेल. याशिवाय उर्वरीत हंगामासाठी तो MCCCच्या काउंटी चॅम्पियनशिप आणि रॉयल लंडन कपमध्ये खेळेल. त्याने भारतासाठी आतापर्यंत ५२ कसोटी, ७७ एकदिवसीय आणि ७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारताचा एक प्रभावी वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादवला ओळखले जाते. 

शाहीन आफ्रिदीच्या जागी उमेशची वर्णी 

उमेश यादवचा Middlesex County Cricket Club मध्ये समावेश करताना क्लबचे प्रमुख अॅलन कोलेमॅन यांनी म्हटले की, आमचा उद्देश होता की, संपूर्ण हंगामात आमच्या सोबत एक विदेशी गोलंदाज राहील, आणि जेव्हापासून शाहीन आफ्रिदी या हंगामाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला परतला आहे, तेव्हापासून आम्ही त्याच्या जागेवर एक चांगला खेळाडू शोधत होतो. उमेश यादवकडे चांगला अनुभव आहे. त्याने स्वत:ला जागतिक पातळीवर सिद्ध केले आहे. तो चॅम्पियनशिप झाल्यानंतर रॉयल लंडन कपमध्ये संघासाठी खेळेल. तो युवा खेळाडूंसाठी एक आदर्श म्हणून खेळेल आणि क्लबमधील युवा खेळाडूंना त्याच्यासोबत खेळल्याने चांगला फायदा होईल.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघकौंटी चॅम्पियनशिपइंग्लंड
Open in App