बंगळुरू, आयपीएल 2019 : यंदाच्या आयपीएलच्या हंगामामध्ये पंचांच्या वादग्रस्त निर्णयांबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या. पंचांच्या काही निर्णयांवर माजी क्रिकेटपटूंनी नाराजीही व्यक्त केली. पण शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीचा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. कोहलीबरोबर झालेल्या या वादानंतर पंचांनीनी नियमांची सीमा ओलांडली. त्यांन चक्क पंचांच्या रुमच्या दरवाजावर रागात लाथ मारली. त्यांनी ही लाथ इतक्या जोरात मारली, की दरवाजाचे नुकसान झाले.
बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या डावाच्या अखेरच्या षटकामध्ये. हे षटक आरसीबीचा वेगवान गोलंदाज उमेश यादव टाकत होता. पहिल्या तीन षटकांमध्ये अठरा धावा दिल्या होत्या. पण अखेरच्या षटकामध्ये हैदराबादच्या केन विलियम्सने त्याचा चांगलाच समाचार घेतला. या षटकातील पाचवा चेंडू नो-बॉल असल्याचा निर्णय पंचांनी दिला. पण जेव्हा रीप्लेमध्ये हा चेंडू पाहिला तेव्हा तो नो-बॉल नसल्याचे स्पष्ट दिसत होते. हा रिप्ले पाहिल्यावर उमेश आणि कोहली यांनी मैदानावरील पंचांकडे धाव घेतली.
या दोघांनी पंचांना हा नो-बॉल नसल्याचे सांगितले. पण मैदानावरील पंच नायजेल लाँग यांनी उमेश आणि कोहलीचे म्हणणे ऐकूनच घेतले नाही. त्यानंतर कोहलीचा पारा चढलेला पाहायला मिळाला. कोहलीने काही वेळ पंचांशी वाद घातला, पण पंच आपली गोष्ट मान्य करत नसल्याचे कळल्यावर मात्र कोहली क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपल्या जागेवर निघून गेला. पहिला डाव संपल्यानंतर लाँग यांनी पंचांसाठीच्या रुमच्या दरवाजावर जोरात लाथ मारली. लाँग यांच्या या कृतीच्या तपासाची जबाबदारी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने रेफरी नारायण कुट्टी यांच्याकडे दिली आहे. सामना संपल्यानंतर लाँग यांनी दंड म्हणून 5000 रुपये कर्नाटक क्रिकेट असोसिएशनकडे भरले.
वॉर्नर ‘ऑरेंज कॅप’च्या तर रबाडा ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत आघाडीवर
डेव्हिड वॉर्नर व कॅगिसो रबाडा यांचा आयपीएल २०१९ मधील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. पण सुरुवातीच्या समान्यांत चमकदार कामगिरीच्या जोरावर हे दोघे अनुक्रमे ‘ऑरेंज कॅप’ व ‘पर्पल कॅप’च्या प्रबळ दावेदारांमध्ये कायम आहेत. वॉर्नरने सनरायजर्स हैदराबादतर्फे १२ सामन्यांत एक शतक व आठ अर्धशतकांच्या जोरावर ६९२ धावा फटकावल्या. त्यानंतर तो विश्वकप स्पर्धेच्या तयारीसाठी मायदेशी परतला.
सर्वाधिक बळी घेणाºया गोलंदाजाला मिळणारी ‘पर्पल कॅप’ सध्या दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज रबाडाकडे आहे. पाठदुखीमुळे त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सावधगिरी बाळगताना मायदेशी परत बोलविले आहे. रबाडाने १२ सामन्यांत २५ बळी घेतले आहेत. त्याला पर्पल कॅपसाठी सर्वात मोठे आव्हान त्याचा मायदेशातील सहकारी इम्रान ताहिरकडून आहे. ताहिरने चेन्नई सुपरकिंग्सचे प्रतिनिधित्व करताना २१ बळी घेतले आहेत.