मुंबई : दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) डीआरएसमध्ये अम्पायर्स कॉलची समीक्षा करण्याची विनंती केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबोर्नमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला या नियमाची झळ बसली.
‘अम्पायर्स कॉल’ प्रामुख्याने पायचीतसाठी रिव्ह्यूची मागणी केल्यानंतर महत्त्वाचा ठरतो. या स्थितीत अम्पायरने नाबाद ठरविल्यानंतरही रिव्ह्यूमध्ये चेंडू यष्टीला लागत असला, तरी टीव्ही पंचाला निर्णयामध्ये बदल करण्याचा अधिकार नसतो. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी केवळ एकच लाभदायक बाब असते ती म्हणजे ते आपला रिव्ह्यू गमावत नाही. तेंडुलकरने ट्विट केले की, ‘मैदानावरील पंचाच्या निर्णयावर नाराज असल्यामुळे खेळाडू रिव्ह्यू घेतात. आयसीसीला डीआरएस प्रणाली विशेषत: ‘अम्पायर्स कॉल’ची पूर्ण समीक्षा करणे आवश्यक आहे.’
यजमान ऑस्ट्रेलियन फलंदाज जो बर्न्स व मार्नस लाबुशेनविरुद्ध पायचीतच्या अपीलनंतर रिप्लेमध्ये वाटले की चेंडू बेल्सला स्पर्श करून जात आहे, पण अम्पायर्स कॉलमुळे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर कायम राहिले.