मैदानातील पंचांनी दोनदा मागितली माफी, मोठे निर्णय चुकले

हे दोन्ही चुकीचे निर्णय भारताच्या खेळाडूंबाबत देण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 11:13 AM2019-11-16T11:13:06+5:302019-11-16T11:13:42+5:30

whatsapp join usJoin us
The umpires on the ground have twice apologized, making wrong decisions | मैदानातील पंचांनी दोनदा मागितली माफी, मोठे निर्णय चुकले

मैदानातील पंचांनी दोनदा मागितली माफी, मोठे निर्णय चुकले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंदूर : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात चक्क दोनदा माफी मागण्याची वेळ पंचांवर आली. कारण मैदानातील पंचांच्या हातून दोन निर्णय चुकीचे दिले गेले. या निर्णयांमुळे सामन्यावर मोठा परीणाम होऊ शकला असता.

कसोटी सामन्यात जर डीआरएस नसले असते तर पंचांच्या चुकीमुळे सामन्याला वेगळे वळण मिळू शकले असते. पण डीआरएस असल्यामुळे योग्य निर्णय पाहायला मिळाले. हे दोन्ही चुकीचे निर्णय भारताच्या खेळाडूंबाबत देण्यात आले होते.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि द्विशतकवीर मयांक अगरवाल यांच्याबाबत हे चुकीचे निर्णय दिल्याचे पाहायला मिळाले. कोहली शून्यावर असताना त्याच्याविरोधात बांगलादेशच्या खेळाडूंनी पायचीतचे जोरदार अपील केले. पण मैदानावरील पंचांनी तो नाबाद असल्याचे सांगितले. त्यानंतर काही क्षणात बांगलादेशने डीआरएस घेतला. त्यामध्ये चेंडू स्टम्पला लागल्याचे दिसत होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी कोहलीला आऊट ठरवले.

अगरवालने या सामन्यात द्विशतकी खेळी साकारली. पण पंचांनी मयांकला ८२ धावांवर असताना बाद ठरवले होते. मेहंदी हसनच्या गोलंदाजीवर बांगलादेशने मयांकविरोधात पायचीतचे अपील केले. मैदानावरील पंचांनी मयांकला बाद ठरवले. पण मयांकने यावेळी डीआरएस घेतला आणि त्यामध्ये तो नाबाद ठरवला गेला. 

Web Title: The umpires on the ground have twice apologized, making wrong decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.