Join us  

Umran Malik Fastest Ball: उमरान मलिकच्या सर्वात वेगवान चेंडूवरून मोठा वाद, चाहतेही चक्रावून गेले, जाणून घ्या काय घडलं?

उमरान मलिकने टाकला ताशी १५६ किमी वेगाचा चेंडू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 6:08 PM

Open in App

Umran Malik Fastest Ball, IND vs SL 1st ODI: भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीचे शतक (नाबाद ११२), रोहित शर्माच्या ८३ धावा आणि शुबमन गिलच्या ७० धावा यांच्या जोरावर भारताने ५० षटकांत ३७३ धावा कुटल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला ५० षटकांत ८ बाद ३०६ धावांपर्यंत मजल मारता आली. दासुन शनाकाच्या शतकाव्यतिरिक्त इतर खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. या सामन्यात भारतीय संघाचा गोलंदाज उमरान मलिक याचा सर्वोत्तम वेगवान चेंडू गाजला. पण आता त्यावरूनच वाद निर्माण झाल्याची चिन्हं आहेत.

उमरान मलिक सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या वेगाची जादू दाखवत आहे. अलीकडेच उमरानने श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत १५५ किमी/ताशी वेगाने चेंडू टाकून विक्रम केला होता. पण आता त्याने आपलाच विक्रम मोडला. श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात उमरानने १५६ किमी/ताशी वेगाने गोलंदाजी केली. पण या चेंडूबाबत वाद निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत हा १५६ किमी/ताशी वेगाचा चेंडू होता की नव्हता, त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

नक्की काय आहे वाद?

खरे पाहता, उमरान मलिकने गुवाहाटी वन डे मध्ये श्रीलंकेच्या डावात १४व्या षटकातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. उमरानचे हे सामन्यातील स्वतःचे दुसरे षटक होते. हा चेंडू टाकल्यानंतर चेंडूचा वेग हिंदी कॉमेंट्री वाहिनीवर दाखवला गेला नाही. पण काही वेळाने त्या षटकातील सर्व चेंडूंचा वेग दाखवण्यात आला, ज्यात तो चेंडू १५६ किमी/ताशी वेग असलेला चेंडू दाखवण्यात आला. अशा स्थितीत हिंदी वाहिनी पाहणाऱ्या चाहत्यांना उमरानने १५६ किमी/तास या वेगाने चेंडू टाकून विक्रम केल्याचे समजले. पण इंग्लिश कॉमेंट्री चॅनलवर त्याच षटकातील चौथ्या चेंडूचा वेग मात्र १४५.७ किमी/ताशी दाखवण्यात आला. त्यामुळे आता संभ्रम निर्माण झाला आहे की त्या चेंडूचा खरा वेग किती होता? हा संभ्रम कायम राहिल्यास उमरानच्या खात्यात १५६ किमी/ताशी वेगाचा चेंडू नोंद होणार की नाही, याबद्दल साशंकता आहे.

हिंदी चॅनेवरील प्रक्षेपण-

इंग्रजी चॅनेलवरील प्रक्षेपण-

उमरानने सामन्यात घेतले ३ बळी

हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीसह एका चॅनलवर दाखवण्यात आलेल्या या चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच, तो स्क्रीनशॉट देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चॅनलवर हिंदी कॉमेंट्रीसह १५६चा वेग दाखवण्यात आला होता. या दरम्यान उमरान मलिकने सामन्यात ८ षटके टाकली आणि त्यात ५७ धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App