IPL 2021, Umran Malik joins Sunrisers Hyderabad as short-term : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) प्ले ऑफ स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकले गेलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला अन् त्यांचा प्रमुख गोलंदाज टी नटराजन ( T Naratajan) याच्यासह सहा जणांना क्वारंटाइन व्हावं लागलं. यानंतरही SRHचा संघ मैदानावर उतरला, परंतु दिल्ली कॅपिटल्सकडून ( DC) त्यांना ८ विकेट्सनं हार मानावी लागली. या पराभवानंतर सनरायझर्सच्या खात्यात ८ सामन्यांत फक्त १ विजयासह २ गुणच राहिले आहेत आणि इथून प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवणे अशक्यच आहे. अशात आता SRHनं इभ्रत वाचवण्यासाठी संघात एक बदल केला आहे.
IPL 2021: KKRचा कर्णधार इयॉन मॉर्नगच्या डोक्यावर बंदीची टांगती तलवार, जाणून घ्या नेमकं कारण
सनरायझर्स हैदराबादनंटी नटराजन याच्याजागी संघात जम्मू-काश्मीरचा मध्यमगती गोलंदाज उम्रान मलिक ( Umran Malik) याचा समावेश केला आहे. मलिक याला शॉर्ट टर्म तत्वावर संघात दाखल करून घेतले आहे. ( Sunrisers Hyderabad have brought in medium pacer Umran Malik as a short-term COVID-19 replacement for T Natarajan) मलिक यानं जम्मू-काश्मीर संघाकडून एक ट्वेंटी-२० व लिस्ट ए सामना खेळला आहे आणि चार विकेट्स घेतल्या आहेत. तो SRH संघासोबत नेट बॉलर म्हणून आधीपासूनच होता.
विराट कोहलीकडे RCBचे कर्णधार वाचवण्याची शेटवची संधी; फ्रँचायझीनं दिलीय तंबी?
आयपीएलचा नियम क्रमांक ६.१ ( c) नुसार फ्रँचायझीला शॉर्ट टर्म तत्वावर खेळाडूला संघात घेता येईल. संघातील मुख्य खेळाडू पुन्हा बायो बबलमध्ये परतेपर्यंत राखीव खेळाडू संघासोबत असेल.