उमरान म्हणजे ‘रफ्तार’! आता लक्ष्य १५५ किमी वेगाचे; भारताला सापडला नवा हिरा

या सत्रात मी १५० किमी वेगवान मारा केलाच आहे. आतापर्यंत आठ सामन्यात १६ गडी बाद केले. पुढे आणखी दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य असेल.’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 06:11 AM2022-04-29T06:11:41+5:302022-04-29T06:12:01+5:30

whatsapp join usJoin us
Umran Malik means 'speed'! Now the target is 155 kmph; India discovers new diamond | उमरान म्हणजे ‘रफ्तार’! आता लक्ष्य १५५ किमी वेगाचे; भारताला सापडला नवा हिरा

उमरान म्हणजे ‘रफ्तार’! आता लक्ष्य १५५ किमी वेगाचे; भारताला सापडला नवा हिरा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : जम्मू काश्मीरचा युवा वेगवान उमरान मलिक आयपीएलचा नवा शोध. बुधवारी गुजरातचा अर्धा संघ त्याने एकट्याने गारद केला. सामना गुजरातने जिंकला; पण ‘सामनावीर’ सनरायजर्सचा उमरान ठरला. आता तो १५५ किमी वेगाने चेंडू टाकण्यास उत्सुक आहे. योग्य दिशा आणि अचूक टप्पा राखूनच मला हे लक्ष्य गाठायचे असल्याचे २२ वर्षांच्या उमरानने म्हटले आहे.

सामन्यानंतर तो म्हणाला,‘ वेगवान मारा करणे, योग्य लेंग्थ राखणे आणि बळी घेण्याची योजना होती. हार्दिकला बाऊन्सरवर तर रिद्धिमान साहाला यॉर्करवर त्रिफळाबाद केले. मैदान लहान असल्याने काळजीपूर्वक चेंडूत विविधता राखली. आता योग्य लय आणि दिशा कायम ठेवून १५५ किमीचा वेग गाठायचा आहे. या सत्रात मी १५० किमी वेगवान मारा केलाच आहे. आतापर्यंत आठ सामन्यात १६ गडी बाद केले. पुढे आणखी दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य असेल.’

काल उमरानला आठव्या षटकात चेंडू सोपविण्यात आला होता. एका डावात आघाडीचे सर्व पाचही फलंदाज बाद करणारा लीगमधील तो पहिला गोलंदाज बनला. उमरान शुभमान गिलला १४४ किमी वेगवान चेंडूवर, हार्दिकला १४४ किमी, रिद्धिमान साहा १५३ किमी, डेव्हिड मिलर १४८ तसेच अभिनव मनोहर याला १४६ किमी वेगवान चेंडूवर माघारी धाडले.

उमरानला इंग्लंड दौऱ्यात खेळवा : गावसकर

वेगाचा नवा ‘हिरा’ उमरान मलिक याला भारतीय संघात घेण्याचे आवाहन दिग्गज सुनील गावसकर यांनी केले आहे. २५ धावांत गुजरातचा अर्धा संघ गारद करणाऱ्या सामनावीर उमरानच्या कामगिरीची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. 
सामन्यादरम्यान समालोचन करताना ते म्हणाले, ‘उमरानचे पुढील लक्ष्य भारतीय संघात स्थान मिळविण्याचे असेल. सध्या मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव संघात असल्याने उमरानला अंतिम एकादशमध्ये संधी मिळेल, असे वाटत नाही. तथापि संघासोबत प्रवास, रोहित आणि विराटसारख्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये हितगुज केल्याचा त्याच्यावर काय सकारात्मक परिणाम होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.’  भारताचा इंग्लंड दौरा जूनमध्ये सुरू होईल. उभय संघात पाच सामन्यांच्या मालिकेतील कोविडमुळे मागच्या वर्षी रद्द झालेला अखेरचा कसोटी सामना खेळला जाईल. यानंतर प्रत्येकी तीन सामन्यांची टी-२० तसेच एकदिवसीय मालिका होणार आहे.

उमरानवर गोलंदाजीचे ओझे वाढवू नका : व्हेट्टोरी
उमरान मलिकने वेगवान गोलंदाजीत अनेकांना धडकी भरविणारी कामगिरी केली. तो भारतासाठी नवा शोध असून त्याच्यावर गोलंदाजीचे दडपण येईल, असे ओझे वाढवू नका, असा सल्ला न्यूझीलंडचा महान गोलंदाज डॅनियल व्हेट्टोरी याने दिला आहे. ब्रेट ली, शोएब मलिक, आणि शॉन टैट यांचा काळ संपल्यानंतर मलिकच्या रूपाने  ‘दुर्लभ प्रतिभेचा’ शोध लागल्याचे सांगून न्यूझीलंडकडून ११३ कसोटींत ३६२ आणि २९५ वन डेत ३०५ गडी बाद करणारे व्हेट्टोरी म्हणाले, ‘उमरानचे चेंडू फलंदाजांमध्ये धडकी भरवतात. तो केवळ तळाच्या स्थानावरील नव्हे तर आघाडीच्या फलंदाजांसाठीही कर्दनकाळ ठरत आहे. सध्याचे गोलंदाज १५३-१५४ किमी वेगाने चेंडू टाकताना दिसत नाहीत.  

 

Web Title: Umran Malik means 'speed'! Now the target is 155 kmph; India discovers new diamond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.