अंडर-१९ क्रिकेट स्पर्धा ; आशिया चषक भारताकडे

मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज अथर्व अंकोलेकर याच्या पाच बळींमुळे भारताने अंडर १९ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकविले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 04:27 AM2019-09-15T04:27:07+5:302019-09-15T04:27:28+5:30

whatsapp join usJoin us
Under-19 Cricket Tournament; Asia Cup to India | अंडर-१९ क्रिकेट स्पर्धा ; आशिया चषक भारताकडे

अंडर-१९ क्रिकेट स्पर्धा ; आशिया चषक भारताकडे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो : मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज अथर्व अंकोलेकर याच्या पाच बळींमुळे भारताने अंडर १९ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकविले. शनिवारी झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात बांगलादेशचा पाच धावांनी पराभव करीत भारताने हा मान मिळविला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात अंकोलेकर व्यतिरिक्त आकाश सिंग याने शानदार गोलंदाजी करीत १२ धावांत तीन गडी बाद केले. सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटील यांना एकेक गडी बाद करण्यात यश आले. भारताने प्रथम फलंदाजी करीत ३२.४ षटकांत केवळ १०६ धावा केल्या. यानंतर १८ वर्षांच्या अंकोलेकरने आठ षटकांत २८ धावांत अर्धा संघ बाद करताच बांगलादेशचा डाव ३३ षटकांत १०१ धावांत संपुष्टात
आला.
विजयासाठी १०७ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात अडखळत झाली. अकबर अली (२३) आणि मृत्युंजय चौधरी (२१) हे लवकर बाद झाले. तजिम हसन शकीब (१२) आणि रकीबुल हसन (नाबाद ११) यांनी नवव्या गड्यासाठी २३ धावांची भागीदारी केली. अंकोलेकरने चार चेंडूंत अखेरच्या दोन्ही फलंदाजांना बाद करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब
केले.
भारतासाठी कर्णधार ध्रुव जुरेल (३३) आणि तळाचा फलंदाज करण लाल (३७) यांनी योगदान दिले. नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा भारताचा निर्णय फसवा ठरला. डावखुरा वेगवान गोलंदाज
चौधरी याने १८ धावांत तीन आणि शमीम हुसेन याने आठ धावांत तीन गडी बाद करीत फलंदाजीला खिंडार पाडले.
पहिल्या ३१ चेंडूंत भारताचे तीन फलंदाज बाद झाले. त्यावेळी फलकावर केवळ आठ धावा होत्या. रावत (१९) बाद होताच पुन्हा फलंदाजी कोलमडली.
>अथर्वची कामगिरी
मुंबईच्या अथर्व अंकोलेकरने या विजयात पाच बळी घेत मोलाचा वाटा उचलला. बांगलादेशला विजयासाठी आठ धावांची गरज असताना अथर्वने ३३ व्या षटकात दोन बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. अथर्वचे वडील विनोद अंकोलेकर बेस्टमध्ये वाहक म्हणून काम करत होते. २०१० मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर अथर्वला त्याची आई वैदेही यांनी क्रिकेटसाठी प्रोत्साहन दिले.
>धावफलक
भारत : सुवेद पारकर ४, धु्रव जुरेल ३३, करण लाल ३७, सुशांत मिश्रा ३, अकाश सिंग नाबाद २. एकूण : ३२.४ षटकात सर्वबाद १०६, गोलंदाजी : मृत्युंजय चौधरी ३/१८, शमीम हुसेन ३/८.
बांगलादेश : अकबर अली २३, मृत्युंजय चौधरी २१, तजिम हसन शकीब १२. एकूण : ३३ षटकात सर्वबाद १०१, गोलंदाजी : आकाश सिंग ३/१२, अथर्व अंकोलेकर ५/२८,

Web Title: Under-19 Cricket Tournament; Asia Cup to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.