ख्राईस्टचर्च : यंदा न्यूझीलंडच्या भूमीवर १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम रंगणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्ष डेबी हॉकले यांनी स्पर्धेतील सर्व कर्णधारांचे स्वागत केले.न्यूझीलंडमधील माउरी संस्कृतीचे लोकनृत्य असलेल्या हाका डान्सच्या ठोक्यावर स्पर्धेतील १६ देशांच्या कर्णधारांनी एन्ट्री केली. हा क्षण सर्व कर्णधारांसाठी अविस्मरणीय असा ठरला. त्यात भारतीय कर्णधार पृथ्वी शॉ याचाही समावेश होता. मोठ्या दिमाखात भारतीय जर्सीत हा खेळाडू उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाला होता. या स्पर्धेला १३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे.१४ जानेवारी रोजी भारताचा पहिला सामना आॅस्ट्रेलियाविरुद्ध होईल. भारतीय संघ ‘ब’ गटात आहे. त्यात आॅस्ट्रेलिया, झिब्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. स्पर्धेतील सराव सामन्यांना उद्यापासून सुरुवात होईल.१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजिली जाते. १३ ते ३ फेब्रुवारीदरम्यान न्यूझीलंड येथे होणारी ही १३ वी स्पर्धा आहे. न्यूझीलंडमध्ये ती तिस-यांदा होत आहे. ‘अ’ गटात वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि केनिया यांचा, ब गटात आॅस्ट्रेलिया, भारत, पीएनजी आणि झिम्बाब्वे यांचा, तर क गटात बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, नामिबिया यांचा व ड गटात पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आयर्लंडचा समावेश आहे. गतवर्षी बांगलादेशमध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.आम्ही आठवड्यापासून येथे आहोत. काही सामनेही खेळलो. सर्व काही ठिक आहे. संघाची तयारीही चांगली झाली. विश्वचषक जिंकणे हे आमचे ध्येय आहे. पहिल्यांदा आम्ही आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावरलक्ष केंद्रित करणार आहोत.-पृथ्वी शॉ
- Cricket Buzz»
- बातम्या»
- १९ वर्षांखालील विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा : भारताचे नेतृत्व पृथ्वीकडे
१९ वर्षांखालील विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा : भारताचे नेतृत्व पृथ्वीकडे
यंदा न्यूझीलंडच्या भूमीवर १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम रंगणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्ष डेबी हॉकले यांनी स्पर्धेतील सर्व कर्णधारांचे स्वागत केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:37 AM