मुंबई- अंडर 19 वर्ल्डकप सेमीफायनल मॅचमध्ये शुभमन गिलने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचविण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. शुभमनने 102 रन्स केले. शुभमनच्या या धमाकेदार रन्समुळे भारताने 272 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर फलंदाजी करायला आलेल्या पाकिस्तान संघाला या धावांचा पाठलाग करणं कठीण झालं. पाकिस्तान संघ रन्सच्या जवळपासही पोहचू शकला नाही. सामन्याच्या आधीपासून शुभमनला दुसरा विराट कोहली किंवा भविष्यातील विराट संबोधलं जातं. शुभमनच्या खेळण्याचा अंदाज आणि त्याचे स्ट्रोक्स विराटसारखे आहेत, असं लोकांना वाटतं. इतकंच नाही, तर शुभमन स्वतःसुद्धा विराटला त्याचा हिरो मानतो. मी विराट कोहलीचा मोठा फॅन आहे, असं शुभमनने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हंटलं होतं.
माझा ऑल टाइम फेव्हरेट सचिन तेंडुलकर आहे. जेव्हा मी क्रिकेट बघायला सुरू केली. तेव्हापासून सचिन माझ्यासाठी महान खेळाडू राहिला आहे. पण आता विराट कोहली माझा आवडला खेळाडू आहे. त्याची स्टाईल मला आवडते. मैदानात सामना सुरू असताना विराट ज्याप्रमाणे प्रेशर सांभाळतो त्याचप्रमाणे मीसुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न करणार आहे. युट्यूबवर विराट कोहलीचा बॅटिंग व्हिडीओ बघायचो. त्यानंतर नेट प्रॅक्टिसमध्ये त्याप्रमाणे खेळायचा प्रयत्न करायचो, असं शुभमनने म्हंटलं आहे.
लाल रूमालाचं रहस्यशुभमन गिलने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यानंतर सांगितलं की, तो बॅटिंग करताना नेहमी एक लाल रूमाल कमरेला लावतो. मी माझ्या कमरेवर सुरूवातीपासून लाल रूमाल लावून खेळतो. आधी पांढऱ्या रंगाचा रूमाल होता. पण एका मॅचमध्ये मी लाल रूमाल वापरला तेव्हा त्या मॅचमध्ये सेंच्युरी केली. त्यानंतर मी प्रत्येक सामन्याच्या वेळी लाल रूमाल वापरतो, असं शुभमनने म्हंटलं.