नवी दिल्ली / मुंबई / चेन्नई : कोरोनाच्या प्रकोपामुळे इंंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वाचे आयोजन १५ एप्रिलपर्यंत लांंबणीवर पडले. नवे चेहरे यामुळे निराश आहेत. पहिल्यांदा खेळण्याची आशा बाळगणाऱ्या या युवा खेळाडूंमध्ये धाकधूक कायम असून संयम आणि सराव याबळावर हे खेळाडू स्वत:ची समजूत घालत आहेत. स्वत: स्वत:ची प्रेरणा बनत आहेत.
बंगालचा युवा अष्टपैलू शाहबाज नदीम याने विराट आणि एबी डिव्हिलियर्स यांना विचारण्यात येणाºया प्रश्नांची यादी तयार केली. तथापि कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सकडून खेळणाºया नदीमची प्रतीक्षा लांबली.
भारताच्या अंडर १९ संघाचे स्टार यशस्वी जैस्वाल आणि कार्तिक त्यागी यांचीही स्थिती अशीच आहे. दोघांवर अनेकांचे लक्ष आहे. ताामिळनाडूचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती देखील याला अपवाद नाही. ही वेळ निघून जाईल, असे सांगून वरून स्वत:ची सममजूत काढतो.
यंदा रणजी करंडकात दमदार कामगिरी करणारा शाहबाज म्हणाला, ‘लिलावाच्या वेळी आरसीबीने मला संघात घेतले, त्यावेळी माझे स्वप्न साकार झााल्यासारखेच होते. विराट आणि डिव्हिलियर्स या दिग्गजांकडून मार्गदर्शन घेईन, असे स्वप्न जोपासले आहे. मला नेट्समध्ये त्यांना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली असती आणि त्यांनी मला मार्गदर्शन केले असते. मात्र सध्या संकट आहे. या घडीला संकट टळण्याची प्रतीक्षा करण्यावाचून पर्याय नाही.’ हरियाणातील मेवात येथे राहणारा २५ वर्षांचा शाहबाज पुढे म्हणाला,‘फिट राहण्यासाठी घरीच सराव करीत आहे.’
वेगवान गोलंदाजीमुळे सर्वांचे आकर्षण ठरलेला उत्तर प्रदेशचा कार्तिक त्यागी हापूडमधील आपल्या घरी प्रशिक्षण घेत आहे. त्याच्याकडे सरावासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. वडिलांनी त्याला घरीच खेळपट्टी बनवून दिली शिवाय नेटची व्यवस्था देखील केली आहे.
कार्तिक म्हणाला,‘ वयाच्या १८ व्या वर्षी कोरोनासारख्या गंभीर संकटावर नियंत्रण कसे मिळवायचे याबद्दल अधिक विचार करू शकत नाही.मी सरावाच्या बळावर सज्ज राहण्याची योजना आखली आहे, दररोज सकाळ आणि सायंकालिन सत्रात चार तास गोलंदाजीचा सराव आणि फिटनेस करतो. ट्रेनर आनंद दाते माझ्यावर लक्ष ठेवतात. माझ्या घरी सरावाची सुविधा उपलब्ध असणे, ही माझ्या जमेची बाब म्हणायला हवी.’
द. आफ्रिकेत झालेल्या अंडर १९ विश्वचषकात त्यागीचा सहकारी राहिलेला मुंबईचा स्टार यशस्वी जैस्वाल म्हणाला,‘ मी पहिल्यांदा आयपीएल खेळणार असल्याचे रोमांचित आहे. मात्र आता आयुष्य वाचविण्याचे आव्हान आहे. राजस्थान रॉयल्स संघातील सहकाऱ्यांसोबत कोचच ज्वाला सरांसोबत शिबिरात सराव केला. आयपीएल लांबले असले तरी प्रत्येक माणसाप्रमाणे मी देखील आशावादी आहे, स्वत:ला स्वस्थ आणि सुरक्षित राखणे यावर सध्या भर देत आहोत. ज्या लोकांना कोरोनाने ग्रासले आहे, त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करीत आहे’.
तामिळनाडू संघात स्थान मिळविण्यासाठी धडपडणारा वरुण चक्रवर्ती म्हणाला,‘स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आयपीएल हे मोठे व्यासपीठ आहे, कोलकाता नाईट रायडर्र्सने वरुणला चार कोटी रुपयात खरेदी केले. करोनामुळे जग थांबल्याचे पाहून दु:ख झाले. आम्ही सर्वजण एकत्रित लढूृन कोरोनावर मात करू, असा विश्वास वाटतो. आयपीएल कधी होईल, याचा विचार मनात डोकावताच चिंताग्रस्त होतो. माझ्यासाठी अनेक गोष्टी आयपीएल आयोजनावर विसंंबून आहेत.
Web Title: Under the IPL event; A shock to many; Young faces frustrated, restrained and practiced
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.