भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी कोणत्याही मैदानावर समोरासमोर आले की त्यात चुरस आलीच. त्यात क्रिकेट हा दोन्ही देशांचा जिव्हाळ्याचा विषय.. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर या कट्टर प्रतिस्पर्धीना भिडताना पाहण्यासाठी सर्वच उत्सुक असतात. आता दोन्ही देशांतील राजकीय संबंध पाहता द्विदेशीय मालिका होत नाही. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धात हे प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येणे ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच. असाच पर्वणीचा सामना वर्ल्ड कप स्पर्धेत रंगणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कट्टर शेजारी एकमेकांना भिडणार आहेत. शुक्रवारी पाकिस्तान संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानला नमवून आगेकूच केली. त्यामुळे आता टीम इंडियाच्या जेतेपदाच्या मार्गात पाकिस्तानचा मोठा अडथळा उभा राहिला आहे.
अफगाणिस्तान संघाचे 190 धावांचे लक्ष्य पाकिस्तान संघाने 41.1 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. त्यामुळे उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 फेब्रुवारीला, तर बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात 6 फेब्रुवारीला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.
भारतानं कोणाला नमवलं ?
उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. 234 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला संघाने 159 धावांत गुंडाळले. कार्तिक त्यागीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
Web Title: Under19 Cricket World Cup india to face pakistan in semi final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.