6 जानेवारी 2021 रोजी भारताचा माजी कर्णधार कपिल देव 62 वर्षांचा झाला. विश्वचषकात टीम इंडिया जिंकणारा तो पहिला कर्णधार आहे. कपिल देव हा खूप शिस्तबद्ध कर्णधार असल्याचे म्हटले जाते. नंतर ते टीम इंडियाचे प्रशिक्षकही झाले. कपिल देवने एकदा 'अंडरवर्ल्ड डॉन' दाऊद इब्राहिमला ड्रेसिंग रूममधून बाहेर काढले होते, याचा खुलासा दिलीप वेंगसरकर यांनी केला. ते या घटनेचे साक्षीदार आहेत. दाऊद टीम इंडियासाठी खास ऑफर घेऊन आला होता, परंतु त्याने त्याला 'गेट आउट' म्हटले.वेंगसरकर यांनी दावा केला की, दाऊद इब्राहिम स्वत: 1986 मध्ये टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये आला होता. त्याने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याबद्दल बक्षीस म्हणून प्रत्येक संघाला कार देण्याबाबत संपूर्ण संघाला सांगितले होते. 1986 च्या ऑस्ट्रेलिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी दाऊदने ही ऑफर दिली होती. पुढे वेंगसरकर म्हणाले, "महमूदने आमची त्यांची ओळख करुन दिली. तो म्हणाला की, तो येथे एक मोठा उद्योगपती आहे. ते आपल्याला बक्षीस देऊ इच्छित आहेत. उद्या तुम्ही पाकिस्तानला हरवले तर तुम्हा सर्वांना गाडी दिली जाईल. ”अशी माहिती जनसत्ताने दिली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला कपिल देव यांनी ड्रेसिंग रूममधून पळवून लावले होते
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला कपिल देव यांनी ड्रेसिंग रूममधून पळवून लावले होते
Dawood And Kapil Dev : दाऊद टीम इंडियासाठी खास ऑफर घेऊन आला होता, परंतु त्याने त्याला 'गेट आउट' म्हटले.
By पूनम अपराज | Published: January 07, 2021 9:41 PM
ठळक मुद्देवेंगसरकर यांनी दावा केला की, दाऊद इब्राहिम स्वत: 1986 मध्ये टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये आला होता. त्याने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याबद्दल बक्षीस म्हणून प्रत्येक संघाला कार देण्याबाबत संपूर्ण संघाला सांगितले होते.