Virat Kohli Resigns as T20 Captain : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहली ( Virat Kohli) यानं टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. मागील अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती, परंतु बीसीसीआयकडून वारंवार या अफवा आहेत, असे सांगण्यात येत होतं. पण, विराटनं गुरुवारी स्वतः ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे जाहीर करून बीसीसीआयचा तोंडघशी पाडले. विराटच्या या कृतीनं बीसीसीआय प्रचंड नाराज झाली आहे आणि भविष्यात त्याच्याकडून वन डे संघाचे नेतृत्वही काढून घेण्याच्या तयारीत आहेत. Kohli’s ODI Captaincy also on line?
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की,''तुम्ही सौरव गांगुली आणि जय शाह यांचे विधान पाहिलेत तर त्या दोघांनी विराटचे अभिनंदन केले, परंतु त्यांच्या विधानातून तो २०२३च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत विराट कर्णधारपदावर कामय राहिल की नाही हे स्पष्ट होत नव्हते.''
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटीत ६५ सामन्यांत सर्वाधिक ३८ विजय मिळवले आहेत, तर १६ सामन्यांत पराभव व ११ सामने अनिर्णीत राहिले आहेत. वन डेत ९५ सामन्यांत ६५ विजय व २७ पराभव, तर ट्वेंटी-२०त ४५ सामन्यांत २७ विजय व १४ पराभव झाले आहेत. Virat Kohli to step down as India's T20 captain after World Cup
रोहित शर्माला उप कर्णधारपदावरून हटवायचे होते विराट कोहलीला, पण उलटा पडला डाव...
बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला काय म्हणाले?
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीचं योगदान फक्त फलंदाज म्हणून नव्हे तर कर्णधार म्हणूनही अविश्वसनीय आहे. कर्णधारपद सोडण्याचा हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे, आपण त्याचा आदर करायला हवा. मला विश्वास आहे की त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकेल, असे राजीव शुक्ला यांनी ANIला सांगितले.
जय शाह म्हणतात, टीम इंडियाचा रोडमॅप ठरलाय!
खेळाडूंवरील कामाचा ताण लक्षात ठेवता आम्ही टीम इंडियासाठी रोडमॅप ठरवला आहे. विराट कोहलीनं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार म्हणून दिलेल्या योगदानाप्रती आम्ही विराटचे आभार मानतो. युवा खेळाडू आणि दृढनिश्चय कर्णधार म्हणून तुझी कामगिरी वाखाण्यजोगी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तू नेतृत्व आणि वैयक्तिक कामगिरी याचातला ताळमेळ योग्यरितीनं सांभाळला आहे, असे जय शाह म्हणाले.
Web Title: ‘Unhappy’ BCCI set to remove Virat Kohli as India’s ODI captain as well, Rohit Sharma is choice of selectors for big role
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.