'इनकम टॅक्स' हा नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांसाठी सर्वाधिक वेदना देणारा शब्द आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी यासंदर्भात काही प्रमाणात दिलासा दिला आहे. टॅक्स (Income Tax) वाचविण्यासाठी मध्यमवर्गीय लोक विविध प्रकारचे जुगाड करत असतात. मात्र जुगाड करण्याचा हा खेळ केवळ मध्यमवर्गीय लोकांपूरताच मर्यादित नाही. तर सर्वांनाच आपली कमाई आपल्याच खिशात ठेवावीशी वाटते. मग ती व्यक्ती माध्यमवर्गीय असो वा उच्चवर्गीय. उदाहरणच घ्यायचे तर सचिन तेंडुलकरचेच (Sachin Tendulkar) घ्याना.
हा किस्सा आहे 2011 चा. सचिन तेंडुलकरने विविध मल्टीनॅशनल कंपन्यांकडून 5.92 कोटी रुपयांची कमाई केली होती. टॅक्स वाचविण्यासाठी त्याने आयटी अॅक्टच्या सेक्शन 80RR अंतर्गत 1.77 कोटी रुपयांची सूट मिळावी यासाठी दावा केला होता. या नियमानुसार, जर एखाद्या अॅक्टरने आपल्या कामाच्या माध्यमाने परदेशातून पैसा कमावला असेल, तो त्या रकमेच्या एक भागावर टॅक्समधून सूट मिळवू शकतो.
सचिनने आपल्या दाव्यात म्हटले होते, की त्याने हा पैसा क्रिकेटच्या माध्यमाने नव्हे, तर जाहिराती आणि स्पॉन्सरशिपच्या माध्यमाने कमावला आहे. मास्टर ब्लास्टरने म्हटले होते, की हा पैसा कमावण्यासाठी त्याचे मुख्य प्रोफेशन क्रिकेट नव्हे तर अॅक्टिंग होते.
ट्रिब्यूनलनेही सचिनला अॅक्टर मानले -
सचिनचा तर्क ऐकल्यानंतर, टॅक्स ट्रिब्यूनलनेही त्याच्या अॅक्टर असल्याच्या दाव्याचा स्वीकार केला आणि त्याला टॅक्समध्ये सूट दिली. ट्रिब्यूनलने या गोष्टीचा स्वीकार केला की, जाहिरात करताना सचिनला लाईट आणि कॅमेऱ्याचा सामना करावा लागतो, जे अॅक्ट्रचेच काम आहे. असे नाही, की सचिन केवळ टॅक्स वाचविण्याच्याच कामात लागला. तो 2010 मध्ये सर्वाधिक टॅक्स देणारा खेळाडू होता. अर्थसंकल्प 2023 मध्ये केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या बजेटमध्ये नव्या टॅक्स स्लॅबची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकांना दिलासा देत टॅक्स सवलतीची मर्यादा वाढवली आहे.
Web Title: Union Budget Sachin Tendulkar became an actor from cricketer to save income tax see what happened
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.