एबी डिव्हिलियर्स लिहितो...
आयपीएलमध्ये संघांच्या ग्लॅमरस मालकांची चर्चाही अधिक असते. अनेकदा तर सामन्यापेक्षा अधिक ड्रामा विजयानंतर होणाऱ्या पार्टीमध्ये दिसून येतो. आरसीबीचे मालकी हक्क असलेल्या युनायटेड स्प्रिटिस लिमिटेडच्या डियाजियो ग्रुप कंपनीने मात्र अनेक वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहण्याचे निश्चित केल्याचे दिसून येते. अमृत थॉमस युसीएलचे अध्यक्ष व मुख्य मार्केटिंग अधिकारी आहेत. त्याचसोबत ते आरसीबीचे चेअरमनही आहेत. क्रिकेटपटूंचे लक्ष खेळावर असावे, असा त्यांचा नेहमी कल असतो.
शनिवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या ‘करा अथवा मरा’ लढतीपूर्वी एक अपवाद बघायला मिळाला. अमृतने संघाला संबोधित केले. त्यांनी मोठे भाषण केले नाही, पण संघाच्या खडतर मोहिमेची तुलना त्यांच्या व्यापारादरम्यान आलेल्या अडचणींसोबत केली. त्यांनी योग्य वेळी योग्य भाष्य केले. त्यामुळे आम्हा सर्वांना प्रेरणा मिळाली.
आम्हाला एक चांगली सुरुवात करण्याची गरज होती. प्रतिस्पर्धी संघाच्या गृहमैदानावर खेळताना एक बाब महत्त्वाची ठरते ती म्हणजे चाहते. दिल्लीमध्ये आम्ही प्रथम गोलंदाजी केली. त्यात युजवेंद्र चहल व मोईन अली यांनी अचूक मारा केला. आम्ही पहिल्या तीन षटकांमध्ये डेअरडेव्हिल्सला अधिक धावा फटकावण्याची संधी दिली नाही, पण पुन्हा एकदा अखेरच्या पाच षटकांमध्ये आम्ही खोºयाने धावा बहाल केल्या. त्यामुळे आमच्यापुढे विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीला दोन विकेट गमावल्यानंतर विराट कोहली व मी खेळपट्टीवर होतो. त्याचा आम्ही दोघेही आनंद घेतो. सुरुवातीला मला संघर्ष करावा लागला. आजारपणातून सावरल्यानंतर पुन्हा फॉर्म मिळवणे कठीण जाते. त्यात विराटला एक्स्ट्रा कव्हर व मिड विकेट या क्षेत्रातून षटकार खेचताना बघून चांगले वाटत होते. तो कौशल्य शानदार असून तो खेळाप्रति समर्पित आहे. त्यामुळे मला पुनरागमन करताना मदत मिळाली. त्यानंतर मी माझी भूमिका बजावली आणि एक षटक राखून लक्ष्य गाठले.
आमचे प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी खेळाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला. जर आपण पुढील तीन सामने जिंकण्यात यशस्वी ठरलो तर आपल्याला रोखणे कठीण जाईल, असेही ते म्हणाले. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. (टीसीएम)
Web Title: Union Words Words Inspirational
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.