नवी दिल्ली : वेस्ट इंडिज संघाचा धडाकेबाज फलंदाज म्हणून ख्रिस गेलची ओळख आहे. तसेच गेलने ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्याने कॅनडात सुरु असलेल्या ग्लोबल ट्वेंटी- 20 लीगमध्ये सोमवारी जोरदार फटकेबाजी करत शतक लगावले. त्याने 12 षटकार व 7 चौकारसह 54 चेंडूंत 122 धावा चोपल्या.अर्धशतक होण्यापूर्वी गेल इतका आक्रमक नव्हता. त्याने 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर शतकी खेळीसाठी त्याने केवळ 19 चेंडूंचा सामना केला. तसेच गेल व्यतिरिक्त व्हॅन डेर ड्यूसेनने 25 चेंडूंत 56 धावा केल्या. ज्यात तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.
गेलच्या वादळी खेळीच्या जोरावर व्हँकोव्हर नाइट्सने मॅन्ट्रियल टाइगर्सच्या विरुद्ध 20 षटकांत 276 धावांचा डोंगर उभा केला. मात्र एवढ्या धावा करुनसुद्दा त्याच्या टीमला विजयापासून दूरच रहावे लागले. कारण, खराब हवामानामुळे दूसरा डाव झाला नाही आणि दोन्ही संघांना 1- 1 गुण देण्यात आले.