चेन्नई येथील एम ए चिदम्बरम स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना ३७६ धावा केल्यावर टीम इंडियाने बांगलादेशच्या संघाला १४९ धावांत आटोपले. २०० पेक्षा अधिक धावांच्या आघाडीसह भारतीय संघाने पाहुण्या बांगलादेश संघाला बॅकफूटवर ढकलले आहे.
जड्डूच्या जाळ्यात फसला शाकिब
बांगलादेशच्या पहिल्या डावात अष्टपैलू शाकिब अल हसन याने संघाकडून सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी आणखी बहरली असती. पण नशिब फुटकं निघालं अन् त्यानं विकेट गमावली. रवींद्र जडेजाने आधी लिटन दासला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर शाकिब त्याच्या गळाला लागला. लिटन दास आणि शाकिब ही एकमेव जोडी होती ज्यांनी अर्धशतकी भागीदारीसर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करताना दिसली. पण जड्डूनं या जोडीचे मनसुबे उधळून लावले.
रोहितनं फिल्डिंग सेट केली अन् उलटा फटका मारण्याचा डाव आला अंगलट
बांगलादेशच्या डावातील ३१ व्या षटकात शाकिब अल हसनला जाळ्यात अडकवण्यासाठी जड्डूनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलीच. पण त्याच्याशिवाय रोहित शर्मानं फिल्ट सेटअपमध्ये बदल करत बांगलादेशी खेळाडूला विचित्र फटका मारायला मजबूर केल्याचा सीनही पाहायला मिळाला. रोहितनं यशस्वी जैस्वालच्या रुपात फिल्डप्लेसमेंटमध्ये बदल केला अन् त्याच्या पुढच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या नादात शाकिब जाळ्यात अडकला.
टप्पा पडला, पण 'बुटा'मुळे लागली वाट
जड्डू घेऊन आलेल्या ३० व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चेंडूवर शाकिब अल हसन याने रिव्हर्स शॉट ट्राय केला. यावेळी चेंडू बॅटला लागून त्याच्या शूजवर आपटला. पहिल्या नजरेत चेंडू टप्पा पडून वरती हवेत गेला आहे, असेच वाटले. विकेटमागे पंतनं झेल घेतल्यावर भारतीय संघाने केलेल्या अपीलनंतर मैदानातील पंचांनी थर्ड अंपायरची मदत घेतली. त्यावेळी रिप्लायमध्ये चेंडूचा टप्पा पडल्याचे स्पष्ट झाले. पण हा टप्पा जमिनीवर नाही तर शाकिबच्या शूजवरच पडला होता. त्यामुळे पंतनं टिपलेला झेल योग्य ठरला आणि शाकिबवर मैदान सोडण्याची वेळ आली.
Web Title: Unlucky Shakib Al Hasan Ball Hits his foot and Rishabh Pant catch Jadeja crucial breakthroughs for Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.