भारताला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद ( Unmukt Chand ) यानं अमेरिकेत खेळण्याचा निर्णय घेतला. भारतानं २०१२चा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखील जिंकला होता. त्यानं अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ धावांची खेळी केली होती. उन्मुक्तनं ६७ प्रथम श्रेणी सामन्यात ८ शतकं व १६ अर्धशतकांसह ३३७९ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १२० सामन्यांत ७ शतकं व ३२ अर्धशतकांसह ४५०५ धावा आहेत, तर ट्वेंटी-२०त त्यानं ७७ सामन्यांत १५६५ धावा केल्या असून त्यात ३ शतकं व ५ अर्धशतकांचा समावेश आहे. भारताचा हा माजी कर्णधार सध्या अमेरिकेच्या ट्वेंटी-२० लीगमध्ये धुमाकूळ घालत आहे.
इशान किशनमुळे रोहित शर्मा दुखपातग्रस्त झाला; मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला, Watch Video
अमेरिकेत सुरू असलेल्या ट्वेंटी-२० लीगमध्ये त्यानं २२ चेंडूंत तब्बल १०२ धावा कुटल्या. अमेरिकेतील मायनर लीग क्रिकेट स्पर्धेत ऑस्टिन एथलेटिक्स आणि सिल्कन व्हॅली स्ट्रायकर्स यांच्यात सामना खेळवला गेला. उन्मुक्त चंद हा स्ट्रायकर्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय आणि ऑस्टिन संघानं २० षटकांत ९ बाद १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात उन्मुक्तनं तुफान फटकेबाजी केली आणि स्ट्रायकर्सनं हा सामना ४ विकेट्स गमावून जिंकला.
रोहितची पत्नी रितिका समोर बसलीय, परंतु चर्चा मागे उभ्या असलेल्या सुंदरीची, कोण आहे ती?
या सामन्यात उन्मुक्तनं १९१.३०च्या स्ट्राईक रेटनं शतक झळकावलं. त्यानं ६९ चेंडूंत १३२ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीत त्यानं २२ चेंडूंत १५ चौकार व ७ षटकार खेचून १०२ धावा कुटल्या.