कँडी : वयाच्या २०व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला. त्या वेळी लाल रंगाच्या एसजी चेंडूने कशी गोलंदाजी करायची याची कल्पना नव्हती. पण वेगवान मारा केला तर पुढे वाटचाल करण्यास मदत मिळेल, याची कल्पना होती, अशी प्रतिक्रिया भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केली आहे.आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सात वर्षांनंतर भारताच्या मुख्य वेगवान गोलंदाजाला अखेर आपल्या क्षमतेनुसार गोलंदाजी करीत असल्याचे वाटत आहे.आतापर्यंत ३३ कसोटी व ७० वन-डे सामने खेळणारा यादव शनिवारपासून श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाºया तिसºया कसोटी सामन्यापूर्वी ‘बीसीसीआय डॉट टीव्ही’सोबत बोलताना म्हणाला, ‘लहानपणापासून क्रिकेट खेळत असल्यामुळे बरीच माहिती असते, पण जर तुम्हाला अचानक काही वेगळे करायला सांगितले तर अडचण भासू शकते.’कसोटीमध्ये ९२ आणि वन-डेमध्ये ९८ बळी घेणारा उमेश म्हणाला, ‘मी टेनिस व रबरी चेंडूने खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या २०व्या वर्षापर्यंत मी सिझन बॉलला हातही लावला नव्हता. एका वेगवान गोलंदाजासाठी हा निश्चितच उशीर झालेला होता. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ...तोपर्यंत लेदर बॉलने गोलंदाजी करणे माहीत नव्हते : उमेश यादव
...तोपर्यंत लेदर बॉलने गोलंदाजी करणे माहीत नव्हते : उमेश यादव
वयाच्या २०व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला. त्या वेळी लाल रंगाच्या एसजी चेंडूने कशी गोलंदाजी करायची याची कल्पना नव्हती. पण वेगवान मारा केला तर पुढे वाटचाल करण्यास मदत मिळेल, याची कल्पना होती, अशी प्रतिक्रिया भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:52 AM
ठळक मुद्दे उमेश यादवने ३३ कसोटी व ७० वन-डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अखेर आता क्षमतेनुसार गोलंदाजी करीत असल्याचे त्याला वाटते.मी टेनिस व रबरी चेंडूने खेळण्यास प्रारंभ केला. वयाच्या २० व्या वर्षांपर्यंत लेदर चेंडूने गोलंदाजी केली नव्हती. २९ वर्षीय उमेश वेगाची कास न सोडता सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रयत्नशील