UP Warriorz Women Set New Record Highest Totals For Women's Premier League History Georgia Voll Miss First Century : जागतिक महिला दिनाच्या शुभ मुहूर्तावर महिला प्रीमियर लीगच्या इतिहातील पहिलं शतक पाहायला मिळेल, असे चित्र निर्माण झाले होते. २१ वर्षीय ऑस्ट्रेलियान महिला क्रिकेटर जॉर्जिया वॉल (Georgia Voll) हिने यूपी वॉरियर्जकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध धमाकेदार बॅटिंग केली. संघाच्या डावाची सुरुवात करणारी जॉर्जिया शेवटपर्यंत मैदानात होती. शेवटचा बॉलही तिनेच खेळला. पण तिचं शतक अवघ्या एका धावेनं हुकलं. तिला शतकी डाव साधता आला नसला तरी यूपी वॉरियर्जनं WPL च्या आतापर्यंच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जॉर्जियाचे शतक हुकले, पण संघानं इतिहास रचला
जॉर्जियानं ५६ चेंडूतील ९९ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर प्ले ऑफ्सच्या रेसमधून बाहेर पडलेल्या यूपी वॉरियर्स संघानं या स्पर्धेच्या इतिहासीतील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या उभारली. २०२३ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स महिला संघानं २२३ धावांसह सेट केलेला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम यूपी वॉरियर्ज संघानं मोडीत काढलाय, रॉयल चॅलंजर्स बंगळुरु वुरुद्ध यूपीच्या संघानं निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २२५ धावांसह नवा रेकॉर्ड सेट केलाय.
जॉर्जियाची नर्वस नाइंटीजच्या क्लबमध्ये एन्ट्री
जॉर्जिया यंदाच्या हंगामात नव्वदीच्या घरात पोहचलेली चौथी बॅटर आहे. याआधी यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियन बाथ मूनी हिने गुजरात जाएंटसकडून खेळताना यूपी वॉरियर्ज विरुद्ध ९६ धावांची नाबाद खेळी केली होती. तर एलिस पेरीनंही आरसीबीकडून खेळताना नाबाद ९० धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या मेग लेनिंगनं ९२ धावांची खेली केल्याचे पाहायला मिळाले होते.
या ४ महिला खेळाडूंनी गाठलाय नव्वदीचा आकडा
याआधी WPL मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम हा सोफी डिवाइनच्या नावे होता. न्यूझीलंडच्या या महिला क्रिकेटरनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून खेळताना २०२३ च्या पहिल्या हंगामात गुजरात जाएंट्स विरुद्धच्या लढतीत ९९ धावा केल्या होत्या. या यादीत नाबाद ९६ धावांसह एलिसा हिलीचाही समावेश आहे. यूपी वॉरियर्जकडून खेळताना २०२३ च्या हंगामात तिने रॉयल चॅलंजर्स बंगळुरु विरुद्ध दमदार खेळी केली होती. भारताची हरमनप्रीत कौर या यादीत चौथ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या हरमनप्रीत कौरनं २०२४ च्या हंगामात गुजरात जाएंट्स विरुद्ध नाबाद ९५ धावांची खेळी केली होती. ताहिला मेग्रा या यादीत ९२ धावांसह सहाव्या स्थानावर आहे.
एक नजर महिला प्रिमीयर लीगमधील सर्वाधिक धावंसंख्येचा रेकॉर्डवर
- यूपी वॉरियर्ज ५ बाद २२५ धावा विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (८ मार्च (२०२५)
- दिल्ली कॅपिटल्स २ बाद २२३ धावा विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (५ मार्च २०२३)
- दिल्ली कॅपिटल्स ४ बाद २११ धावा विरुद्ध यूपी वॉरियर्ज (७ मार्च २०२३)
- मुंबई इंडियन्स ४ बाद २०७ धावा विरुद्ध गुजरात जाएंट्स (४ मार्च २०२३)
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ४ बाद २०२ धावा विरुद्ध गुजरात जाएंट्स (१४ फेब्रुवारी २०२५)
- गुजरात जाएंट्स ७ बाद २०१ धावा विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (८ मार्च २०२३)
- गुजरात जाएंट्स ५ बाद २०१ धावा विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (१४ फेब्रुवारी २०२५)
Web Title: UP Warriorz Women Set New Record Highest Totals For Women's Premier League History Against Royal Challengers Bengaluru Georgia Voll Miss First Century Just 1 Run
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.