Big Update : KL Rahul पहिल्या २ सामन्यांत नाही खेळणार, राहुल द्रविडने दिली माहिती; इशान किशनला संधी

Asia Cup 2023 : भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी आज कोलम्बोसाठी रवाना होणार आहे. २ सप्टेंबरला भारताचा पहिला मुकाबला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 01:38 PM2023-08-29T13:38:23+5:302023-08-29T13:39:20+5:30

whatsapp join usJoin us
UPDATE - KL Rahul is progressing really well but will not be available for India’s first two matches – against Pakistan and Nepal of the Asia Cup2023: Head Coach Rahul Dravid; Ishan kishan will play in his place | Big Update : KL Rahul पहिल्या २ सामन्यांत नाही खेळणार, राहुल द्रविडने दिली माहिती; इशान किशनला संधी

Big Update : KL Rahul पहिल्या २ सामन्यांत नाही खेळणार, राहुल द्रविडने दिली माहिती; इशान किशनला संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 : भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी आज कोलम्बोसाठी रवाना होणार आहे. २ सप्टेंबरला भारताचा पहिला मुकाबला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ ६ दिवसांपासून बंगळुरू येथे सराव करतोय. दुखापतीतून सावरणारे लोकेश राहुलश्रेयस अय्यर यांनी सराव सत्रात चांगली कामगिरी केली. त्यामुळे भारतीय चाहते आनंदात होते, परंतु KL Rahul पहिल्या दोन सामन्यांत खेळणार नसल्याचे अपडेट्स मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांनी दिले आहेत. त्यामुळे इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार हे जवळपास पक्के आहे.


''लोकेश राहुलने फलंदाजी चांगली केली, यष्टिंमागेही चांगला खेळ त्याने केला आहे. त्याच्या तंदुरुस्तीत चांगली सुधारणा आहे, परंतु वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर आहे. त्यामुळे त्याला लगेच मॅच खेळण्यास उतरवणे, धोकादायक ठरेल. पण, तो पहिल्या दोन सामन्यांत खेळणार नाही. श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याने दमदार फलंदाजी केली,''असे द्रविड म्हणाला.  



भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.  

Web Title: UPDATE - KL Rahul is progressing really well but will not be available for India’s first two matches – against Pakistan and Nepal of the Asia Cup2023: Head Coach Rahul Dravid; Ishan kishan will play in his place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.