ICC ODI World Cup PAK vs SA Live : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करो किंवा मरो या सामन्यात पाकिस्तान संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात येताच त्यांना मोठा धक्का बसला. पाकिस्तानसाठी पहिले षटक टाकण्यासाठी फिरकीपटू इफ्तिखार अहमद आला आणि त्याच्या दुसऱ्या चेंडूवर टेम्बा बवुमाने हलका फटका मारून एक धाव घेतली. मिडऑनला क्षेत्ररक्षण करणारा शादाब खान ( Shadab Khan) तो चेंडू अडवताना मैदानावर पडला आणि त्याचं डोकं मैदानावर आपटले. तो क्षेत्ररक्षण करताना पडून जखमी झाला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. पाकिस्तानच्या वैद्यकिय टीमने त्याला सामन्यातून माघार घेण्याचा सल्ला दिला आणि उसामा मीर कन्कशन म्हणून मैदानावर आला आहे.
PAK vs SA Live : Run Out करायचं सोडून, पाकिस्तानी खेळाडूने चेंडू सहकाऱ्याला फेकून मारला अन्...
शादाब खानला मानेला दुखापत झाल्याचे अपडेट मिळाले. त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे, कारण चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी आहे. ज्यावर दक्षिण आफ्रिकेच्या तब्रेझ शम्सीने ४ विकेट घेतल्या. यामुळेच बाबर आझमने इफ्तिखारकडे पहिली ओव्हर सोपवली. त्यानंतर कदाचित तो शादाबला पॉवरप्लेमध्येही गोलंदाजी करायला लावू शकला असता. पण अशाप्रकारे क्षेत्ररक्षण करताना शादाब मैदानाबाहेर गेल्याने आता बाबर आझमचे टेन्शन वाढले आहे.
पाकिस्तान संघाचा संपूर्ण संघ २७० धावांवर तंबूत परतला. सौद शकील आणि शादाब खान यांनी जबाबदारी स्वीकारली आणि सहाव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. शादाबने ३६ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३६ धावा केल्या, तर शकीलने ५२ चेंडूंत ५२ धावा केल्या. वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने तीन बळी घेतले. कर्णधार बाबर आझमने ५० धावा केल्या.