Updates on T20 World Cup 2024 (Marathi News) : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा नुकतीच पार पडली आणि अवघ्या सहा महिन्यांवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होऊ घातला आहे. वेस्ट इंडिज व अमेरिका यांच्या संयुक्तविद्यमाने हा वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व २० संघ पात्र ठरले आहेत आणि आता वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे. भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातली लढत केव्हा व कुठे आहे, हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे आणि त्याच संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत.
अमेरिकेतील फ्लोरिडा, टेक्सास व लाँग आयलँड येथील स्टेडियमवर सामने होणार आहेत, परंतु भारत-पाकिस्तान लढतीसाठी न्यूयॉर्कमधील स्टेडियम सज्ज होत असल्याचे वृत्त समोर येत आहे. न्यूयॉर्क शहरात ७ लाखांहून अधिक भारतीय व १ लाखांहून अधिक पाकिस्तानी वंशाचे लोकं राहतात, त्यामुळे IND vs PAK सामन्यासाठी या शहराची निवड केली गेली आहे. शिवाय भारत व अमेरिकेच्या पूर्व तटीय भागातील वेळेत साडेदहा तासांचा फरक आहे. त्यामुळे भारतीय चाहते डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत ७ वेळा समोरासमोर आले आणि भारताने सहा विजय मिळवले आहेत. पाकिस्तानने २०२१च्या वर्ल्ड कपमध्ये प्रथमच भारतावर विजय मिळवला होता. पुढल्या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हे दोन्ही संघ एकाच गटात असतील असे वृत्त दी टेलीग्राफने दिले आहे. स्पर्धेच्या फॉरमॅटनुसार भारत-पाकिस्तान यांच्यात या वर्ल्ड कपमध्ये तीन सामने होण्याची शक्यता आहे...
पात्र ठरलेले २० संघ...अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
स्पर्धेचा फॉरमॅट...- २० संघ- प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी - चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र- सुपर ८मध्ये ४-४ अशा दोन गटांत संघांची विभागणी - दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत- फायनल