नवी दिल्ली-
बॉलीवूडची ब्युटी क्वीन उर्वरी रौतेला भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतसोबतच्या नात्यावरुन चर्चेचा विषय राहिली आहे. दोघांमधील प्रेम आणि वाद अशा दोन्ही बाजू वेगवेगळ्या बातम्यांमधून आजवर समोर आलं आहे. पण दोघांचं खरंच नातं आहे का? आणि यमागचं सत्य काय हे जाणून घेण्यासाठी आजही चाहते उत्सुक आहेत. आता भारताचा युवा क्रिकेटपटू शुबमन गिल यानं रिषभ आणि उर्वशी यांच्या नात्याची खरी कहाणी सर्वांसमोर मांडली आहे.
शुबमन गिलच्या एका मुलाखतीचा अंश सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये टेलिव्हिजन शोच्या सुत्रसंचालकानं गिलला उर्वशी आणि रिषभ यांच्या नात्याबाबत विचारणा केली. त्यावर शुबमननं मनमोकळेपणानं उत्तर दिलं आहे. रिषभ पंतशी निगडीत एका अभिनेत्रीचं नाव सध्या वारंवार घेतलं जात आहे. मग संघातही त्याला त्या अभिनेत्रीच्या नावानं चिडवलं जातं का?, असा प्रश्न शुबमन गिल याला विचारण्यात आला होता.
"ती स्वत:च यात जाणूनबुजून पडत आहे. स्वत:च डिवचून घेत आहे. रिषभ पंतचा याच्याशी काहीही संबंध नाही. ती स्वत:च असं काहीतरी करुन चिडवण्याचं आमंत्रण देत आहे", असं शुबमन गिल म्हणाला. रिषभ पंत यामुळे वैतागतो किंवा निराश होतो का? असं विचारलं असता अजिबात नाही, असं स्पष्ट शब्दात शुबमननं सांगितलं. "नाही. रिषभला अजिबात फरक पडत नाही. कारण त्याला माहित आहे की काहीच नाहीय", असं शुबमन गिल म्हणाला.
उर्वशी आणि रिषभमध्ये नेमका वाद काय?मीडिया रिपोर्टनुसार उर्वशी रौतेला आणि रिषभ पंत एकेकाळी एकमेकांना डेट करत होते. पण आता दोघांमध्ये खूप अंतर निर्माण झालं आहे. दोघंही एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. दोघांमधील वाद आणि टीका सध्या चर्चेचा विषय बनला आहे. उर्वशी रौतेलाच्या एका मुलाखतीनंतर दोघांमधील शीतयुद्धाला सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं.
उर्वशीनं मुलाखतीत रिषभ पंतचं नाव न घेता सांगितलं होतं की एकेकाळी एक व्यक्ती हॉटेलच्या लॉबीमध्ये माझी १०-१० तास वाट पाहात बसायचा. उर्वशीचा हाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रिषभ पंतनंही तिच्यावर टीका करत एक इन्स्टास्टोरी पोस्ट केली होती. रिषभनं उर्वशीचं नाव न घेता.. 'पीछा छोड दो बहन', असं म्हटलं होतं. दरम्यान, स्टोरी पोस्ट केल्याच्या काही मिनिटांनी रिषभनं ती डिलीट केली होती. पण दोघांमधील वाद अजूनही कायम आहेत. आता या वादाचं पुढे काय होतं हे आता येणारा काळच ठरवेल.