भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस धक्कादायक वृत्ताने उजाडला. पहाटे पहाटेच आईच्या सांगण्यावरून घरी परतत असताना टीम इंडियाचा यष्टीरक्षक रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. तो देखील गंभीर जखमी असल्याचे समजताच चाहत्यांच्या काळजात धस् झाले. परंतू, रिषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून तो बोलण्याच्या मनस्थितीत असल्याचे समजताच चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
रिषभ पंतच्या अपघातानंतर त्याच्या प्रकृती सुधारणेसाठी क्रिकेट विश्वासह बॉलिवूड जगतातून प्रार्थना सुरु झाल्या आहेत. यात रिषभची कथित गर्लफ्रेंड उर्वशी रौतेलाचेही नाव आहे. उर्वशीने रिषभसाठी पोस्ट केली आहे.
खरेतर रिषभचा अपघात झाला आणि लोकांना उर्वशीची आठवण येऊ लागली. अनेकांनी तर इन्स्टाग्रामवर उर्वशीच्या काही पोस्टवर मोर्चाच उघडला होता. रिषभच्या अपघातानंतर उर्वशी पंतच्या खुशालीचा मेसेज करेल अशी अपेक्षा साऱ्यांना होती. काहींनी तिलाच दोष देण्यासही सुरुवात केली होती. यातच काही वेळापूर्वी उर्वशीने एक फोटो शेअर केला आणि प्रार्थना करत असल्याचे कॅप्शन लिहिले. लोकांनी त्याकडे लक्ष न देता तिचाच क्लास घ्यायला सुरुवात केली.
Rishabh Pant Car Accident: रिषभ पंत एकटाच कारमध्ये अडकलेला, आग लागली; लोकांनी काच फोडली अन्...
एका चाहत्याने तर पड़ गई कलेजे को ठंडक? अशा शब्दांत उर्वशीला बोल सुनावले आहेत. दुसऱ्याने तर आरपी कोण आहे हे माहित नाही, पण ही प्रार्थना करतेय, असे म्हटले आहे.
आरपी तिला दिल्लीतील हॉटेलच्या खोलीत भेटायला आला होता आणि तासनतास तिची वाट पाहत होता, असा दावा उर्वशीने केला होता. यानंतर सोशल मीडियावर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. उर्वशी रौतेलानेही त्याचे नाव न घेता 'छोटू भैया' म्हणून पोस्ट करण्यास सुरुवात केली. यावेळी रिषभने 'मेरा पीछा छोड़ दो दीदी' म्हटले होते.