Join us  

मजेशीर Video! Dale Steyn ला अमेरिकेत T20WC साठी नेमलेला कर्मचारी शिकवतोय गोलंदाजी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या भेदक माऱ्याने फलंदाजांना हैराण करणाऱ्या डेल स्टेनवर अमेरिकेत गोलंदाजी कशी करावी हे जाणून घेण्याची वेळ आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 8:21 PM

Open in App

T20 World Cup 2024 : १८ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या भेदक माऱ्याने फलंदाजांना हैराण करणाऱ्या डेल स्टेनवर अमेरिकेत गोलंदाजी कशी करावी हे जाणून घेण्याची वेळ आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज Dale Steyn याला कोणाच्या ओळखीची गरज नाही. पण, अमेरिकेत सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आफ्रिकेच्या गोलंदाजाला तेथील कर्मचाऱ्याने ओळखले नाही आणि महान खेळाडूला गोलंदाजी कशी करावी, हे तो शिकवू लागला. स्टेन यानेही अंहकार बाजूला ठेऊन तो कर्मचारी जसा सांगतोय, तशी गोलंदाजी केली. सोशल मीडियावर सध्या हा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

अमेरिकेसाठी क्रिकेट हे तसं नवीनच आहे... त्यांचा क्रिकेट संघ असला तरी हा देश बेसबॉल, बास्केटबॉल, सॉकर आदी खेळांचा अधिक चाहता आहे. त्यामुळेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांना फार गर्दी झालेली पाहायला मिळत नाही. क्रिकेट हा खेळ तेथील लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने कळावा यासाठी आयसीसी व अमेरिका क्रिकेट संघटना काम करताना दिसत आहे. त्यासाठी स्टेडियमबाहेर वर्कशॉप घेण्यात येत आहेत. अशाच एका वर्क शॉपला डेल स्टेनने अचानक भेट दिली. तेथील कर्मचाऱ्याला तो कोण आहे, हेही माहित नव्हते आणि तो स्टेनला गोलंदाजी कशी करावी हे सांगताना दिसला. स्टेनही नम्रपणे कर्मचाऱ्याच्या सुचनांचे पालन करत होता. 

स्टेनने २०२१ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने २००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय कसोटी संघात पदार्पण केले होते. त्याने ९३ कसोटी सामन्यांत ४३९ विकेट्स घेतल्या. २०१९मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध आपली शेवटची कसोटी खेळली. २००८ मध्ये त्याला वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू आणि २०१३ मध्ये विस्डेनचा सर्वोत्तम क्रिकेटपटू या पुरस्कारांनी गौरविले गेले होते. २००८ ते २०१४ या कालावधीत २६३ आठवडे तो आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान होता. त्याने १२५ वन डे सामने व ४७ ट्वेंटी-२० सामनेही खेळले. त्याशिवाय फ्रँचायझी लीगमध्येही त्याने दबदबा बनवला होता.  

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024द. आफ्रिकाऑफ द फिल्ड