नवी दिल्ली : कोरोनामुळे चेंडूला चकाकी आणण्यासाठी आयसीसीने लाळेच्या वापरावर निर्बंध घातले. तथापि खेळाडूची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास लाळेच्या उपयोगाची मुभा देण्याचा आयसीसीने विचार करायला हवा, असे मत माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याने व्यक्त केले.
क्रिकेटमध्ये लाळेचा उपयोग किती हे पटवून सांगताना आगरकर म्हणाला, ‘फलंदाजांसाठी बॅटचे जितके महत्त्व आहे, तितकेच गोलंदाजांसाठीलाळेचे...’
आयसीसीची ही बंदी ८ जुलैपासून इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून लागू राहील. कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या तीन महिन्यात ही पहिलीच मालिका असेल.
सद्यस्थितीत मात्र आयसीसी क्रिकेट आणि आरोग्य समितीपुढे बंदीवाचून पर्याय नव्हता, अशी कबुलीदेखील आगरकरने दिली. तो पुढे म्हणाला, ‘चेंडूला चकाकी आणणे महत्त्वपूर्ण आहे. दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसताना समितीने हा कठीण निर्णय घेतला. इंग्लंडमधील मालिकेत काय घडते हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.’
क्रिकेटमध्ये आधीच फलंदाजांचे वर्चस्व आहे. लाळेवर बंदी आल्यामुळे वेगवान गोलंदाजांची अवस्था आणखी दयनीय होणार असल्याचे भाकीत ३४९ गडी बाद करणाºया ४२ वर्षांच्या या खेळाडूने केले आहे. वन डे क्रिकेटमध्ये देशाकडून सर्वाधिक गडी बाद करणाºया गोलंदाजांच्या यादीत तिसºया स्थानी असलेल्या आगरकरच्या मते, विश्व क्रिकेटमध्ये फलंदाजांचा बोलबाला असून अलीकडे काही वर्षांत मात्र खेळपट्टी गोलंदाजांना पूरक बनू लागली आहे. (वृत्तसंस्था)
‘सामना सुरू होण्याआधी खेळाडूंची वैद्यकीय चाचणी होणार आहे. खेळाडू कोरोना संक्रमित नसतील तर लाळेचा उपयोग करू द्यायला हरकत नाही. हा माझा विचार असला तरी वैद्यकीय तज्ज्ञ यावर उत्कृष्ट मत मांडू शकतात.’
-अजित आगरकर
Web Title: Use of saliva can be allowed if players test negative before the match says Ajit Agarkar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.