भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट द्वंद्व हे जगजाहीर आहे. या दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या राजकीय परिस्थितीचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावरही उमटताना अनेकदा दिसले आहेत. सध्याच्या घडीला भारतीय संघ जगातला अव्वल संघ आहे आणि त्यांना हरवणं सहज सोपं नक्कीच नाही. परंतु, एक काळ असाही होता की भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागत होते. पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्या काळाच्या आठवणींना उजाळा दिला. पण, त्यांनी केलेलं विधान हे बालिश होतं.
गौतम गंभीरनं जपली माणुसकी; घरकाम करणाऱ्या महिलेचे स्वतः केले अंत्यसंस्कार
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 59 कसोटी सामने झाले आहेत आणि त्यापैकी पाकिस्ताननं 12 सामने जिंकले आहेत. भारताला केवळ 9 सामने जिंकता आले आहेत, तर 38 सामने बरोबरीत सुटले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये उभय संघ 132 वेळा एकमेकांना भिडले आहेत आणि त्यातही पाकिस्तानने सर्वाधिक 73 सामने जिंकले आहेत. भारताचा विजयाचा आकडा हा 55 राहिला आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला एकदाही भारतीय संघावर विजय मिळवता आलेला नाही.
Irfan Pathanने समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचे कान टोचले; करून दिली जबाबदारीची जाणीव
इम्रान खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी भारतीय कर्णधार आणि खेळाडू पाकिस्तानचा सामना करताना घाबरायचे असा दावा केला आहे.''मला भारतीय संघाचे वाईट वाटते, कारण आम्ही त्यांना सहज हरवायचो. आमच्याविरुद्ध खेळताना भारतीय संघ प्रचंड दबावाखाली असायचा. भारतीय संघाचा कर्णधार नाणेफेकीला यायचा तेव्हा त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावरील भीती जाणवायची. अर्थात त्यावेळी आमचा कट्टर प्रतिस्पर्धी भारत नव्हता तर वेस्ट इंडिजचा संघ होता.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या...
सचिननं 26/11 हल्ल्यातील शहिदांना वाहिली होती अनोखी श्रद्धांजली...
अंजलीला 'डेट' करण्यासाठी सचिन तेंडुलकर सरदार बनला, अन्...
विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा
2007मध्ये निवृत्ती घेणार होता सचिन तेंडुलकर, पण परदेशातून फोन आला अन्...