ट्वेन्टी-२० च्या झटपट क्रिकेटमध्ये कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा वसुल करण्यासाठी फलंदाज वेगवेगळे शॉर्ट्स खेळताना दिसतात. सध्या सूर्यकुमार यादव याचं मोठं उदाहरण म्हणता येईल. स्टेडियमच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू टोलवण्याचा हातखंडा सूर्यकुमारच्या फलंदाजीत आहे. अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरुनही सूर्यकुमारला शॉट्स खेळताना आपण पाहिलं आहे. रिव्हर्स शॉट असो किंवा मग खेळपट्टीवर बसून थेट षटकार ठोकण्याची हटके बॅटिंग सूर्यकुमार असे आगळेवेगळे शॉर्ट्स सहजतेनं खेळताना दिसतो. म्हणूनच त्याला मिस्टर ३६० डीग्री प्लेअर असं म्हटलं जाऊ लागलं आहे.
सूर्यकुमारच्या अशाच एका आगळ्यावेगळ्या फटक्याची कॉपी करण्याचा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानं प्रयत्न केला खरा पण जसा आपला 'सूर्या' खेळतो ते काही साधंसोपं काम नाही. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा 'बिग बॅश' लीगमधील सामन्यात डिट्टो सूर्यकुमारच्या फलंदाजीची कॉपी करायला गेला आणि फसला. वेगवान चेंडू उस्मानच्या थेट हेल्मेटवर आदळला. सुदैवानं उस्मानला कोणतीही दुखापत झाली नाही. पण गॅप शोधून काढण्यासाठी धोका पत्करणारे शॉर्ट्स खेळणं काही सोपं काम नाही. त्यासाठीही नेट्समध्ये वेगळा सराव करावा लागतो.
स्कूप शॉट खेळणं जोखमीचं काम
उस्मान ख्वाजाने स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण ते काही जमू शकलं नाही. सूर्यकुमार खेळत असलेले हटके शॉर्ट्स त्यालाही इतक्या सहजपणे जमलंय असंही नाही. "नेट्समध्ये या हटके शॉट्सचा आपण तासंतास सराव करतो आणि त्यामुळेच सामन्यात यशस्वी होतो", असं खुद्द सूर्यकुमारनं म्हटलं होतं. ख्वाजा हा मात्र तंत्रशुद्ध क्रिकेट शॉट्स खेळण्यासाठी ओळखला जातो, कदाचित म्हणूनच तो स्कूप शॉर्ट्स खेळणं त्याला जमलेलं नाही.
Web Title: usman khawaja struck on helmet jason behrendorff big bash league video brisbane heat perth scorchers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.