उस्मान ख्वाजाचे शतक, आॅस्ट्रेलियाकडे १३३ धावांची आघाडी

उस्मान ख्वाजाच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने अखेरच्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात शनिवारी तिसºया दिवसअखेर ४ बाद ४७९ धावांची मजल मारली आणि इंग्लंडविरुद्ध १३३ धावांची आघाडी घेतली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 03:42 AM2018-01-07T03:42:54+5:302018-01-07T03:43:01+5:30

whatsapp join usJoin us
Usman Khawaja's century, 133 for Australia | उस्मान ख्वाजाचे शतक, आॅस्ट्रेलियाकडे १३३ धावांची आघाडी

उस्मान ख्वाजाचे शतक, आॅस्ट्रेलियाकडे १३३ धावांची आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी : उस्मान ख्वाजाच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने अखेरच्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात शनिवारी तिसºया दिवसअखेर ४ बाद ४७९ धावांची मजल मारली आणि इंग्लंडविरुद्ध १३३ धावांची आघाडी घेतली.
आॅस्ट्रेलियाने चहापानापर्यंत इंग्लंडची पहिल्या डावातील ३४६ धावसंख्या ओलांडली होती. ख्वाजाने ३८१ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार व १ षटकाराच्या मदतीने १७१ धावांची खेळी केली. त्याला मेसन क्रेनने बाद केले. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या ख्वाजाचे हे सहावे कसोटी शतक आहे. त्याने सिडनीमध्ये प्रथमच शतक झळकावले. मालिकेत चौथ्यांदा अर्धशतकाची वेस ओलांडणारा शॉन मार्श ९८ धावांवर खेळत आहे. मिशेल मार्श ६३ धावांवर खेळत आहे. मार्श बंधूंनी पाचव्या विकेटसाठी १०४ धावांची अभेद्य भागीदारी केली
आहे. इंग्लंडने उपाहारापूर्वी
स्टीव्ह स्मिथला माघारी परतवले.
त्याने ८३ धावा फटकावल्या. मोईन अलीने आॅस्ट्रेलियन कर्णधाराला आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. आॅस्ट्रेलियाने दुसºया
दिवसअखेर २ बाद १९३ धावांची
मजल मारली होती. (वृत्तसंस्था)

धावफलक
इंग्लंड : पहिला डाव ३४६. आॅस्ट्रेलिया पहिला डाव (कालच्या २ बाद १९३ धावसंख्येवरून पुढे) :- ख्वाजा यष्टिचित बेयरस्टॉ गो. क्रेन १७१, स्मिथ झे. व गो. अली ८३, शॉन मार्श खेळत आहे ९८, मिशेल मार्श खेळत आहे ६३. अवांतर (८). एकूण : १५७ षटकांत ४ बाद ४७९. बाद क्रम : १-१, २-८६, ३-३२७, ४-३७५. गोलंदाजी : अँडरसन ३०-११-५२-१, ब्रॉड २३-३-७०-१, अली ३७-९-१२५-१, कुरण २०-२-७१-०, क्रेन ३९-३-१३५-१, रुट ८-३-२१-०.

Web Title: Usman Khawaja's century, 133 for Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.