Valentine's Day Special: ते प्रेमाचे दिवस! रात्री बारानंतर रितिकासोबत 'लाँग ड्राइव्ह' अन्...रोहितचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Valentine's Day 2025 Special: एक नजर क्रिकेटच्या मैदानातील राजा अन् स्पोर्ट्सशी कनेक्ट असल्यामुळे त्याच्या मनात भरलेली राणी यांच्या प्रेम कहाणीतील प्रपोजचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:48 IST2025-02-13T16:16:30+5:302025-02-13T16:48:10+5:30

whatsapp join usJoin us
Valentines Day 2025 How Did Rohit Sharma Propose To Ritika Sajdeh Old Video Viral Again | Valentine's Day Special: ते प्रेमाचे दिवस! रात्री बारानंतर रितिकासोबत 'लाँग ड्राइव्ह' अन्...रोहितचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Valentine's Day Special: ते प्रेमाचे दिवस! रात्री बारानंतर रितिकासोबत 'लाँग ड्राइव्ह' अन्...रोहितचा व्हिडिओ होतोय व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Ritika Sajdeh Love Story: तरुणाईमध्ये 'व्हॅलेंटाईन्स डे'ची तुफान क्रेझ पाहायला मिळते. दरवर्षी १४ फेब्रुवारीला प्रेमाचा खास दिवस साजरा केला जातो. सोशल मीडियावर 'व्हॅलेंटाईन्स डे'चा ट्रेंड सेट होत असताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या हिट जोडीची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आलीये. यामागचं कारण आहे रोहित शर्माचा एक व्हिडिओ. इथं एक नजर टाकुयात क्रिकेटच्या मैदानातील  राजा (रोहित शर्मा) अन् स्पोर्ट्सशी कनेक्ट असल्यामुळे त्याच्या मनात भरलेली राणी (रितिका सजदेह) यांच्या प्रेम कहाणीतील प्रपोजचा खास किस्सा

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रोहित-रितिकाची लव्हस्टोरी, हिटमॅनचा जुना व्हिडिओ व्हायरल 

रोहित शर्मा अन् रितिका सजदेह यांची प्रेम कहाणी एकदम 'झिंगाट' आहे. जवळपास सहा वर्षे एकमेकांसोबत डेट केल्यावर ही जोडी लग्नबंधनात अडकली होती. दोघांचा संसार अगदी गुण्या गोविंदानं सुरुये. रोहितची मॅच पाहायला रितिका दिसणार नाही, असं क्वचितच घडतं. ती बहुतांशवेळा आपल्या नवरोबाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थितीत राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. हा सीन दोघांच्यातील प्रेमाची खास स्टोरीच सांगून जायचा. आता रोहित शर्माचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात तो रितिकाला प्रपोज केल्याचा किस्सा शेअर करताना दिसते. 

आईस्क्रिमची गोडी अन् लाँग ड्राइव्हची स्टोरी

रोहित शर्माचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात क्रिकेटर रितिकाला प्रपोज कसं केलं? ते सांगताना दिसते. व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की, त्यावेळी आयपीएल स्पर्धा सुरु होती. १३ एप्रिलला माझा वाढदिवस होता अन् याच महिन्यात २९ तारखेला मी प्रपोज केले. मी रितिकाला सांगितले की, आईस्क्रिम खायला बाहेर जाऊया. ती आश्चर्यचकित झाली. कारण त्यावेळी रात्रीचे बारा वाजले होते. लाँग ड्राइव्ह करत आम्ही बोरिवलीला पोहचला. आइस्क्रिम खायला इतक्या दूर आल्यामुळे ती थोडी गोंधळली होती. 

आवडीचं गाणं अन् प्रेमाचा प्रस्ताव   

पुढे रोहित म्हणतो की, मी तिला प्रपोज करण्यासाठी त्या मैदानावर घेऊन गेलो जिथून मी माझ्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात केली. कारमध्ये रितिकाच्या आवडीचे गाणं लावलं. अन् गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केले. दोघांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण होतो. त्यासाठी हे मला मनापासून करायचे होते. यावेळी बिचारीला अश्रू अनावर झाले होते, असेही तो या व्हिडिओमध्ये सांगताना दिसते.  



 
 कशी झाली रितिका आणि रोहितची भेट?

रितिका सजदेह स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करत होती. रोहित शर्मा आणि तिची पहिली भेट एका जाहिरातीच्या निमित्तानेच झाली होती. ती माझी बहिण आहे. तिच्यापासून लांब रहा असं युवीनं रोहितला म्हटले होते. या पहिल्या भेटीनंतर दोघांच्यातील मैत्री फुलली भेटीचा सिलसिला सुरु झाला अन् प्रेमाच गाणं वाजलं. डेडिंगनंतर लग्नाच सेटिंग झालं अन् ही जोडी आता स्वीट कपलच्या रुपात गाजताना दिसते.  

Web Title: Valentines Day 2025 How Did Rohit Sharma Propose To Ritika Sajdeh Old Video Viral Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.