Join us  

महेंद्रसिंग धोनी ValentinesDayला करतोय तरी काय, जाणून घ्या...

आज 'व्हॅलेंटाइन डे'च्या धोनी नेमका आहे तरी, कुठे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण दस्तुरखुद्द धोनीनेच याबाबतचा खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 6:27 PM

Open in App

महेंद्रसिंग धोनी हा सध्याच्या घडीला भारतीय संघात नाही, तरीही तो चर्चेचा विषय नेहमीच ठरत असतो. धोनी भारतीय संघात नेमका कधी पुनरागमन करणार, याची चर्चा नेहमीच सुरु असते. पण आज 'व्हॅलेंटाइन डे'च्या धोनी नेमका आहे तरी, कुठे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण दस्तुरखुद्द धोनीनेच याबाबतचा खुलासा केला आहे.

'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी धोनी एका खास व्यक्तीबरोबर एका खास ठिकाणी गेला आहे. ही गोष्ट फार कमीच जणांना माहिती होती. पण धोनीने आपण 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी कोणाबरोबर आणि कुठे आहोत याबाबत त्यानेच खुलासा केला आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार की नाही, घेणार तर कधी घेणार, तो टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळणार की मैदानाबाहेरच निवृत्ती जाहीर करणार, आदी अनेक प्रश्न चाहत्यांच्या डोक्यात बाऊंसरसारखे आदळत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) नुकत्याच जाहीर केलेल्या सेंट्रल काँट्रॅक्टमधून धोनीला वगळले आहे. त्यानंतर धोनीला निवृत्तीचे संकेत देण्यात आले, असाही अर्थ लावण्यात आला.

सध्याच्या घडीला धोनी विश्रांती घेत आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे धोनी सध्या विश्रांती घेत आहे. काही दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षीने त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

धोनी 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी आहे तरी कुठे, याचे उत्तर त्यानेच दिले आहे. धोनी सध्या कान्हा अभयारण्यामध्ये आहे. तो काही दिवसांपूर्वी तिथे गेला होता. पण आजच्या 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने त्याने आपण कान्हामध्ये आहोत, असे म्हटले आहे. त्याचबरोबर धोनीने इंस्टाग्रामवर एका वाघाचा फोटोही शेअर केला आहे.

 

आगामी इंडियन प्रीमिअर लीग ही धोनीच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. पण, आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यास धोनी निवृत्ती घेऊ शकतो, असे संकेत शास्त्रींनी दिली.''मलाही तुम्हाला हेच विचारायचं आहे. आता आयपीएल येत आहे. त्यानंतर सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. निवड समिती, कर्णधार सर्वांचे आपल्याकडे लक्ष आहे, याची जाण धोनीलाही आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे धोनीलाच स्वतःच्या पुढच्या वाटचालीबाबत कळेल. निवृत्तीचा निर्णय हा त्याच्याच हाती आहे. तुम्ही त्याला जाणता आणि मीही..''

शास्त्री पुढे म्हणाले,''धोनी स्वतःला चांगलं जाणून आहे. कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर करताना आपण 100 सामने खेळावे असा विचारही त्यानं केला नाही. कुठे थांबायला हवं, हे त्याला माहीत आहे. त्यानं अजून सरावाला सुरुवात केली आहे की नाही, याची मला कल्पना नाही. पण, तो आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक नक्की असेल. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी करता न आल्यास, तो स्वतः 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल.''   

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीवाघ