Join us

पाकिस्तानी खेळाडू मैदानावरील कामगिरीपेक्षा मसाज करण्यात तरबेज, तोच खरा पुरुष; अभिनेत्री वीणा मलिकचा दावा

वीणा मलिकनं सांगितले की, क्रिकेटपेक्षा आसिफ पायांचा मसाज करण्यात अधिक तरबेज होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 14:41 IST

Open in App

पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आसिफ ( mohammad asif) आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक ( veena malik) यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. वीणा मलिकनं भारतातील टीव्ही शो बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता आणि बोल्ड अंदाजामुळे ती नेहमी चर्चेत असते. आता तिनं नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. तिनं एका मुलाखतीत मोहम्मद आसिफ तिच्या पायांची मसाज करायचा, असा दावा केला. आसिफ क्रिकेट खेळण्यापेक्षा चांगल्या प्रकारे मसाज करायचा असंही ती म्हणाली. वीणा मलिकनं सांगितले की, क्रिकेटपेक्षा आसिफ पायांचा मसाज करण्यात अधिक तरबेज होता. माझ्यासाठी तोच खरा पुरुष होता. तो माझ्या पायांची मसाज करायचा आणि ते क्षण मी विसरू शकत नाही. तेव्हा मला अनेकदा वाटायचे तो क्रिकेटपटूपेक्षा चांगला फुट मसाजर झाला असता.

2010मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मोहम्मद आसिफचे नाव समोर आल्यानंतर वीणा मलिकनं त्यांचं नातं तोडलं. 2010मध्ये इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत आसिफ, तत्कालिन कर्णधार सलमान बट आणि मोहम्मद आमिर हे स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले होते. लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात तीनही क्रिकेटपटूंवर सट्टेबाज मजहर माजिद याच्यासह मिळून स्पॉट फिक्सिंग करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. न्यूज ऑफ वर्ल्डनं स्टिंग ऑपरेशन करून हे प्रकरण समोर आणले होते. या सामन्यापूर्वी नो बॉल केव्हा फेकले जातील हे ठरले होते आणि त्यासाठी खेळाडूंना भरपूर रक्कम दिली गेली होती.     सलमान बट, आमिर व आसिफ यांना 2011मध्ये आयसीसीनं 5 वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावली.  

टॅग्स :वीणा मलिकपाकिस्तानमॅच फिक्सिंग