वेलोसिटीचा दणदणीत विजय, शफाली अन् लॉराची तुफान फटकेबाजी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना वेलोसिटीने शेफाली वर्मा आणि लॉरा वॉल्वार्ड यांच्या अर्धशतकाच्या जोरावर बाजी मारली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 05:40 AM2022-05-25T05:40:07+5:302022-05-25T05:40:33+5:30

whatsapp join usJoin us
Velocity's resounding victory, Shefali Anlor's storm shot | वेलोसिटीचा दणदणीत विजय, शफाली अन् लॉराची तुफान फटकेबाजी

वेलोसिटीचा दणदणीत विजय, शफाली अन् लॉराची तुफान फटकेबाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे : वेलोसिटीने महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेत विजयी सुरुवात करताना सुपरनोव्हास संघाला ७ बळींनी नमवले. वेलोसिटीने अचूक गोलंदाजीच्या जोरावर सुपरनोव्हासला ५ बाद १५० धावांवर रोखल्यानंतर विजयी लक्ष्य ३ फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना वेलोसिटीने शेफाली वर्मा आणि लॉरा वॉल्वार्ड यांच्या अर्धशतकाच्या जोरावर बाजी मारली. शेफालीने ३३ चेंडूंत ९ चौकार व एका षट्कारासह ५१, तर लॉराने ३५ चेंडूंत ७ चौकार व एका षट्कारासह नाबाद ५१ धावा केल्या. लॉरा आणि कर्णधार दीप्ती शर्मा (२४*) यांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद ७१ धावा करत संघाला विजयी केले. त्याआधी, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर सुपरनोव्हास संघाने समाधानकारक मजल मारली. 

संक्षिप्त धावफलक 
सुपरनोव्हास : २० षटकांत ५ बाद १५० धावा (हरमनप्रीत कौर ७१, तानिया भाटिया ३६; केटा क्रॉस २/२४.) पराभूत वि. वेलोसिटी : १८.२ षटकांत ३ बाद १५१ धावा (शेफाली वर्मा ५१, लॉरा वॉल्वार्ड नाबाद ५१, दीप्ती शर्मा नाबाद २४; डीअँड्रा डॉट्टिन २/२१.)

Web Title: Velocity's resounding victory, Shefali Anlor's storm shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.