Join us  

वेलोसिटीचा दणदणीत विजय, शफाली अन् लॉराची तुफान फटकेबाजी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना वेलोसिटीने शेफाली वर्मा आणि लॉरा वॉल्वार्ड यांच्या अर्धशतकाच्या जोरावर बाजी मारली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 5:40 AM

Open in App

पुणे : वेलोसिटीने महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेत विजयी सुरुवात करताना सुपरनोव्हास संघाला ७ बळींनी नमवले. वेलोसिटीने अचूक गोलंदाजीच्या जोरावर सुपरनोव्हासला ५ बाद १५० धावांवर रोखल्यानंतर विजयी लक्ष्य ३ फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना वेलोसिटीने शेफाली वर्मा आणि लॉरा वॉल्वार्ड यांच्या अर्धशतकाच्या जोरावर बाजी मारली. शेफालीने ३३ चेंडूंत ९ चौकार व एका षट्कारासह ५१, तर लॉराने ३५ चेंडूंत ७ चौकार व एका षट्कारासह नाबाद ५१ धावा केल्या. लॉरा आणि कर्णधार दीप्ती शर्मा (२४*) यांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद ७१ धावा करत संघाला विजयी केले. त्याआधी, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर सुपरनोव्हास संघाने समाधानकारक मजल मारली. 

संक्षिप्त धावफलक सुपरनोव्हास : २० षटकांत ५ बाद १५० धावा (हरमनप्रीत कौर ७१, तानिया भाटिया ३६; केटा क्रॉस २/२४.) पराभूत वि. वेलोसिटी : १८.२ षटकांत ३ बाद १५१ धावा (शेफाली वर्मा ५१, लॉरा वॉल्वार्ड नाबाद ५१, दीप्ती शर्मा नाबाद २४; डीअँड्रा डॉट्टिन २/२१.)

टॅग्स :पुणेआयपीएल २०२२
Open in App