Join us

ज्याच्यासाठी मोठी किंमत मोजली त्या तगड्या गड्यानं वाढवलं शाहरुखच्या KKR चं टेन्शन! असं काय घडलं?

रणजी सामन्यावेळी घडली IPL टीमला टेन्शन देणारी गोष्ट , जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 21:44 IST

Open in App

क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय अन् खेळाडूंना मालामाल करणारी आयपीएल स्पर्धेच्या १८ वा हंगाम अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपला आहे. या स्पर्धेचा माहोल तयार होत असतान गत चॅम्पियन आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची धकधक वाढवणारी गोष्ट घडलीये. देशांतर्गत रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना केकेआरचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झालाय. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ज्याच्यासाठी तगडी किंमत मोजली, त्याने वाढवलं शाहरुख खानच्या संघाच टेन्शन

आयपीएलच्या आगामी हंगामा आधी कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील ऑल राउंडर व्यंकटेश अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. हा शाहरुखच्या संघासाठी मोठा धक्का आहे. आयपीएल मेगा लिलावात कोलकाताच्या संघाने व्यंकटेश अय्यरसाठी तब्बल  २३.७५ कोटी खर्च करून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. जर तो दुखापतीतून रिकव्हर झाला नाही तर कोलकाता संघासाठी मोठा फटका बसू शकतो. 

या खेळाडूसंदर्भात नेमकं काय घडलं?

तिरुअनंतपुरमच्या सेंट झेवियर्स कॉलेज ग्राउंडवर मध्यप्रदेश विरुद्ध केरळ यांच्यात रणजी सामना सुरु आहे. मध्य प्रदेशच्या संघानं ४९ धावंवर ४ विकेट्स गमावल्यावर व्यंकटेश अय्यर मैदानात उतरला. फक्त तीन चेंडूचा सामना केल्यावर घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने मैदान सोडलं. संघाच्या ८ विकेट्स पडल्यावर तो पुन्हा मैदानात उतरला. त्याने ८० चेंडूत ४२ धावांची खेळी केली. पण यादरम्यान त्याने कोलकाता संघाला अन् चाहत्यांना चांगलेच टेन्शन दिले. ही दुखापत गंभीर नसावी, अशी अपेक्षा शाहरुखचा संघ करत असेल.

फक्त खेळाड नव्हे तो कॅप्टन्सीचाही चेहरा

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कोलकाता संघ कोणाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार ते अजून गुलदस्त्यातच आहे. पण मेगा लिलावात व्यंकटेश अय्यरवर त्यांनी लावलेली बोली पाहता तोच या संघाचे नेतृत्व करताना दिसून शकते. त्यामुळे हा खेळाडू संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. आयपीएलच्या नियमानुसार, खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याला करारानुसार शंभर टक्के रक्कम मिळू शकते. याचा अर्थ खेळाडूची दुखापतही संघ मालकासाठी अधिक टेन्शन देणारी ठरते.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५वेंकटेश अय्यरशाहरुख खानकोलकाता नाईट रायडर्सरणजी करंडक