T20 World Cup, India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan) यांच्यासह शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी पासून ते आजी-माजी सर्व खेळाडूंनी बाबर आजम अँड टीमचे कौतुक केलं. पाकिस्तानी मंत्री बेताल वक्तव्य करू लागली, त्यांच्यापर्यंत ठीक होतं, पण पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूस यानं टीव्ही चॅनेलवर बेताल वक्तव्य केलं. एका पाकिस्तानी चॅनेलच्या कार्यक्रमात वकार म्हणाला,''मोहम्मद रिझवानच्या फलंदाजीपेक्षा त्यांनी एवढ्या हिंदूंसमोर नमाज पठण केलं. तो क्षण मला सर्वात सुखावणारा होता.''
त्याच्या या वक्तव्याचा समालोचक हर्षा भोगले यानं समाचार घेतला. त्यानं ट्विट केलं की,''वकार युनिसच्या वक्तव्यानं निराश झालो. या विधानामागची काळी बाजू पाकिस्तानातील क्रीडा प्रेमिंना समजली असेल, अशी मी आशा करतो. तेही माझ्या बाजूने होतील.
''असा क्रिकेटपटू या खेळाचा सदिच्छादूत होऊ शकतो का, त्यानं जबाबदारीनं विधान करायला हवं होतं. मला खात्री आहे की वकारकडून या विधानावर माफी मागितली जाईल. क्रिकेटनं जगाला एकत्र आणायचंय, त्याला धर्माचा रंग देऊन तोडायचं नाही,''असेही भोगलेंनी ट्विट केलं.
''जिहादी मानसिकता असलेल्या सडक्या डोक्यातून हा खेळ दुषित केला जातोय. काय निलाजरा माणूस आहे,''असे भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद यानं ट्विट केलं.
Web Title: Venkatesh prasad & Harsha Bhogle slams Waqar Younis for calling Rizwan’s on-field namaz in front of Hindus special
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.