आयपीएलचा सोळावा हंगाम दणक्यात सुरू आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या क्रिकेट टीमसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमधून बाहेर होण्याची शक्यता आहे. विल्यमसनला आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात झालेल्या सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करत असताना केन विल्यमसनला दुखापत झाली होती.
दुखापत झाल्यानंतर विल्यमसन न्यूझीलंडला माघारी परतला होता. त्यानंतर मंगळवारी करण्यात आलेल्या स्कॅनमधून त्याला त्याच्या डाव्या गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागेल, अशी माहिती समोर आली आहे. न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या तीन आठवड्यांमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया जाईल. विल्यमसनने ही माहिती मिळाल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट आणि गुजरात टायटन्सचे आभार मानले आहेत.
त्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मला चांगलं सहकार्य मिळालं. त्यासाठी मी गुजरात टायटन्सचे आभार मानतो. अशा प्रकारे दुखापत झाल्याने मी निराश झालो आहे. मात्र आता माझं लक्ष हे सर्जरी आणि त्यानंतर फिटनेस परत मिळवण्यावर आहे, यासाठी काही वेळ जावा लागेल, मात्र मी लवकरात लवकर मैदानात उतरण्यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करेन.
अशा प्रकारच्या दुखापतीमधून सावरणे आणि पूर्णपणे फिट होण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपपूर्वी तो पूर्णपणे फिट होणे कठीण दिसत आहे. विल्यमसनने सांगितले की, मी पुढच्या काही मनिह्यांमध्ये मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड आणि संघाचं कसं सहकार्य करू शकतो, यावर लक्ष देत आहे.
न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनाही विल्यमसन वर्ल्डकपपूर्वी पूर्णपणे फिट होईल, असं वाटत नाही. त्यांनी सांगितलं की, आम्ही आशा सोडलेली नाही. मात्र आताची स्थिती पाहता हे फार कठीण वाटत आहे. आमच्या सदिच्छा सध्या केन विल्यसनसोबत आहेत. हा त्याच्यासाठी खूप कठीण काळ आहे. ही अशी दुखापत नाही आहे जिची तुम्ही अपेक्षा करता, हा मोठा धक्का आहे, असेही त्यांनी सांगितले.
Web Title: Very bad news came during IPL 2023, this legendary batsman Kan Williamson was out of the 2023 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.