भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पा ( Robin Uthappa ) याने २००९ चे आयपीएल पर्व हे कारकीर्दितील सर्वात वाईट असल्याचे मत व्यक्त केले. २००८मध्ये रॉबिन मुंबई इंडियन्सकडून खेळला होता आणि त्यानंतर पुढील पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. त्या पर्वात त्याला १५ सामन्यांत फक्त १७५ धावा करता आल्या होत्या. त्यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश होता. २००९च्या पर्वात RCBने फायनलपर्यंत धडक मारली होती, परंतु रॉबिनला काही खास कामगिरी करता आली नव्हती. तेच २०१०च्या पर्वात त्याने ३१.१६च्या सरासरीने १६ सामन्यांत ३७४ धावा केल्या. त्यात तीन शतकांचा समावेश होता. २००९चे पर्व हे नैराश्यमयी असल्याचे मत रॉबिनने व्यक्त केले आणि या संपूर्ण पर्वात त्याला संघर्ष करावा लागला होता.
'' मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी अनुभवत होतो आणि RCB सोबतच्या माझ्या पहिल्या सत्रात मी पूर्णपणे नैराश्यात गेलो होतो. मी त्या मोसमात एकही सामना चांगला खेळला नाही. एकमेव खेळ ज्यामध्ये मी चांगली कामगिरी केली तेव्हा मला वगळण्यात आले आणि पुन्हा निवडले गेले. या सामन्यात मला खरोखर काहीतरी करण्याची गरज आहे, असा विचार करून मी खेळलो. MI मधील कोणीतरी मला सांगितले होते की जर मी हस्तांतरणाच्या कागदपत्रांवर ( transfer papers) स्वाक्षरी केली नाही तर मी MIच्या अंतिम ११ मध्ये खेळू शकणार नाही,''असा खुलासा त्याने आर अश्विनच्या youtube चॅनेलवर बोलताना केला.
तो पुढे म्हणाला,'' मला असे वाटते की मी RCBच्या सर्वोत्तम टप्प्यात खेळलो. आयपीएलमधील हा एक टप्पा होता जिथे पहिले वर्ष खूप मजेदार होते. दुसऱ्या वर्षापासून ते खूप मोठं झालं. मी जहीर खान आणि मनीष पांडे यांच्यासोबत होतो. आयपीएलमध्ये बदली झालेल्या पहिल्या लोकांपैकी मी एक होतो. माझ्यासाठी, ते अत्यंत कठीण झाले कारण त्या वेळी माझी निष्ठा पूर्णपणे MI बरोबर होती. हे आयपीएलच्या एक महिना आधी घडले आणि मी हस्तांतरणाच्या कागदपत्रांवर सही करण्यास नकार दिला.''
Web Title: Veteran batter Robin Uthappa has revealed he had to go through the worst phase of his career during IPL 2009 in first season with RCB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.