सिडनी : वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा आॅस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे बाधित झालेल्यांसाठी खेळवण्यात येणाऱ्या मदतनिधी सामन्यात सहभागी होईल.
वेस्ट इंडिजकडून १३१ कसोटीत ५२.८९ च्या सरासरीने ११,९५३ धावा करणा-या लाराने या सामन्यात खेळणार असल्याचे कळवले आहे. यापूर्वी भारताचा युवराज सिंग व पाकिस्तानच्या वासिम अक्रम यांनीही या सामन्यात खेळणार असल्याचे सांगितले आहे.
या सामन्याला बुशफायर क्रिकेट बॅश असेन नाव देण्यात आले असून हा सामना ८ फेबु्रवारीला होईल. या दिवशीच आॅस्ट्रेलिया वि. भारत महिला टी२० सामना होणार असून बिग बॅशच्या अंतिम सामन्यातील रक्कमही आग पिडितांसाठी देण्यात येईल.
सचिन तेंडुलकर व कोर्टनी वॉल्श हे अनुक्रमे रिकी पॉँटिंग इलेव्हन व शेन वॉर्न इलेव्हन संघाचे प्रशिक्षक असतील. (वृत्तसंस्था)
Web Title: Veteran cricketer Brian Lara will play to raise funds
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.