IPL 2024, Mumbai Indians Rohit Sharma : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ सीझन मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत काही खास राहिलेला नाही. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला पहिल्या तीन सामन्यांत सलग पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर मुंबईने दोन सामने जिंकले, तर मागील सामन्यात मुंबईला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. ६ सामन्यांत दोन विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी प्ले ऑफचे गणित अवघड झाले आहे. हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय चाहत्यांना तसा फारसा आवडला नव्हता आणि यावर रोहित शर्माने आतापर्यंत भाष्ट केले नव्हते. पण, मागील १० वर्ष MI चा कर्णधार असलेला माजी कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे .
India vs Pakistan कसोटी मालिकेबाबत रोहित शर्माचं मोठं विधान; निर्माण होऊ शकतो नवा वाद?
क्लब प्रेरी फायर पॉडकास्टमध्ये रोहित शर्मा म्हणाला, ''MIच्या संघात एक उत्तम संस्कृती निर्माण करण्यासाठी मी गेली १० वर्ष सपोर्ट स्टाफसोबत काम करत आहे. या संस्कृतीमुळे संघाने पिछाडीवरून दमदार पुनरागमन केले आहे. वर्षानुवर्षे मुंबई इंडियन्स लीगमध्ये हळुहळू सुरुवात करतो आणि नंतर परिस्थिती बदलते.''
''गेल्या दहा वर्षांत बघितले तर संघाच्या प्रशिक्षकात बदल झाले, पण कर्णधार कायम तोच राहिला आहे. मी एका प्रकारच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो. जो कोणी नवीन खेळाडू येतो, त्याने माझ्या प्रक्रियेचे पालन करावे असे मला वाटते. आयपीएलमध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावे, हे मला माहित्येय. हे एका व्यक्तीचे काम नाही, हे आपण सर्व समजतो. यश मिळवण्यासाठीस सहाय्यक स्टाफच्या समर्थनाची आवश्यकता आहे. पाँटिंगपासून ते जयवर्धने आणि आता मार्क बाऊचरपर्यंत सर्वांनी खूप मदत केली आहे,''असेही तो म्हणाला.
मुंबईला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्माकडून फ्रँचायझीने कर्णधारपदाची जबाबदारी घेत हार्दिक पांड्याकडे सोपवली. मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आतापर्यंत विशेष काही करता आलेले नाही. त्यांचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.