Mumbai Indians IPL 2022 : पराभवाच्या Sixer नंतर मुंबई इंडियन्सला आठवला जुना सहकारी; रोहित शर्माने मालकांकडे सुचवलं नाव, कॉमेंट्री बॉक्समधून थेट मैदानावर उतरणार!

आयपीएलची पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:23 PM2022-04-20T15:23:30+5:302022-04-20T15:25:25+5:30

whatsapp join usJoin us
veteran pacer Dhawal Kulkarni set to join Mumbai Indians squad for IPL 2022 | Mumbai Indians IPL 2022 : पराभवाच्या Sixer नंतर मुंबई इंडियन्सला आठवला जुना सहकारी; रोहित शर्माने मालकांकडे सुचवलं नाव, कॉमेंट्री बॉक्समधून थेट मैदानावर उतरणार!

Mumbai Indians IPL 2022 : पराभवाच्या Sixer नंतर मुंबई इंडियन्सला आठवला जुना सहकारी; रोहित शर्माने मालकांकडे सुचवलं नाव, कॉमेंट्री बॉक्समधून थेट मैदानावर उतरणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्सची इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील सुरूवात निराशाजनक झाली आहे. आयपीएलची पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यात आणखी एक पराभव त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणण्यासाठी पुरेसा ठरणारा आहे. अशात आता कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) पुढील प्रत्येक पाऊल जपून टाकण्याचा निर्धार केल्याचा दिसतोय. यंदाच्या पर्वात डेथ ओव्हरमध्ये स्पेशालिस्ट गोलंदाजाची उणीव मुंबईला प्रकर्षाने जाणवतेय आणि हिच कमकुवत बाजू बळकट करण्यासाठी MI ने पावलं उचवण्यास सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) खांद्याला खांदा लावून MIला विजय मिळवून देणारा गोलंदाज लवकरच ताफ्यात दाखल होणार आहे. 

ताज्या माहितीनुसार अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णी ( Dhawal Kulkarni ) हा लवकरच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये कुलकर्णीवर कोणीच बोली लावली नव्हती आणि त्यानंतर तो IPL 2022च्या हिंदी समालोचकांच्या टीमचा सदस्य झाला होता. पण, आता त्याला पुन्हा मैदानावर उतरण्याची संधी मिळणार आहे.  मुंबई इंडियन्स सहा पराभवांमुळे गुणतालिकेत तळाला आहे. अनुभवी गोलंदाजाची उणीव MIसाठी डोकेदुखी ठरतेय आणि म्हणूनच ३३ वर्षीय कुलकर्णीची आठवण मुंबईला झाली आहे.

कुलकर्णीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससह राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्स यांचे प्रतिनिधित्व करताना ९२ सामन्यांत ८६ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२०च्या लिलावात मुंबई इंडियन्सने ७५ लाखांत त्याला करारबद्ध केले होते आणि २०२१मध्येही तो संघाचा भाग होता. पण, या कालावधीत त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.  पण, सध्याच्या परिस्थितीनुसार त्याला अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे. ''मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला संघाच्या गोलंदाजीची धार तीव्र करण्यासाठी कुलकर्णी कोणत्याही परिस्थितीत हवा आहे. मुंबईचाच असल्यामुळे त्याला येथील खेळपट्टींचा चांगला अभ्यास आहे,''असे सूत्रांनी TOI ला सांगितले.  
 

Web Title: veteran pacer Dhawal Kulkarni set to join Mumbai Indians squad for IPL 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.