Join us  

IND vs AUS : यशस्वीची चूक अन् ऋतुराज एकही चेंडू न खेळता बाहेर; जैस्वाललाही अति घाई नडली

IND vs AUS live Match : वन डे विश्वचषक उंचावल्यानंतर ऑस्ट्रेलयन संघ भारतात यजमान संघांसोबत ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 9:17 PM

Open in App

IND vs AUS 1st T20 Match Live Updates | विशाखापट्टनम : ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीलाच दोन मोठे धक्के बसले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड स्वस्तात बाद झाले अन् कर्णधार सूर्यकुमार यादवला ४ षटकांच्या आतच खेळपट्टीवर यावं लागलं. पहिल्याच षटकात चौकार आणि षटकार ठोकून जैस्वालने चांगली सुरूवात केली. पण, पहिल्याच षटकातील जैस्वालची एक चूक भारताला चांगलीच महागात पडली. 

मार्कस स्टॉयनिसचे षटक सुरू होते, यशस्वीने षटकार आणि चौकाराच्या मदतीने १२ धावा कुटल्या. पण एक चुकीचा कॉल भारतीय उप कर्णधाराला बाद करण्यात पुरेसा ठरला. यशस्वी जैस्वालने दुसरी धाव काढण्यासाठी प्रयत्न केला आणि तसे ऋतुराजलाही आमंत्रण दिले. पण अखेर यशस्वीने निर्णय बदलला अन् ऋतुराज गायकवाड एकही चेंडू न खेळता धावबाद झाला.  त्यानंतर जैस्वालने एक चौकार आणि एक षटकार मारून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला अति घाई नडली आणि भारताला दुसरा झटका बसला. जैस्वालने ८ चेंडूत २१ धावांची छोटी खेळी केली. त्याला बाद करण्यात मॅथ्यू शॉर्टला यश आले.

भारतासमोर २०९ धावांचे आव्हानप्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने धावांचा डोंगर उभारला. जोश इंग्लिसचे वादळ भारताच्या युवा ब्रिगेडला धुवून गेले. इंग्लिसने केवळ ५० चेंडूत ८ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ११० धावांची स्फोटक खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने (५२) धावा करून ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहचवले. घातक वाटणाऱ्या इंग्लिसला बाद करण्यात प्रसिद्ध कृष्णाला अखेर यश आले. पण इंग्लिसने शतक झळकावून आपले काम केले होते. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. अखेरच्या काही षटकांमध्ये टिम डेव्हिडने स्फोटक खेळी करताना १३ चेंडूत १९ धावा केल्या. अखेरचे षटक मुकेश कुमारने अप्रतिम टाकून कांगारूंना २०८ धावांवर रोखले. लक्षणीय बाब म्हणजे अखेरच्या षटकात एक नो बॉल गेला असताना देखील मुकेशने केवळ ५ धावा देण्याची किमया साधली. भारताला विजयी सलामी देण्यासाठी १२० चेंडूत २०९ धावांची आवश्यकता आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियायशस्वी जैस्वालऋतुराज गायकवाडभारतीय क्रिकेट संघ