इंदूर : येथे सुरु असलेल्या रणजीच्या अंतिम सामन्यामध्ये विदर्भाने दिल्लीचा पराभव करत पहिल्यांदाच रणजी चषकावर नाव कोरलं. सांघिक खेळाच्या बळावर विदर्भाच्या संघानं दिल्लीचा पराभव केला. पहिल्य़ा डावातील 252 धावांच्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात दिल्लीला 280 धावांत गुंडाळलं. रणजी चषकावर नाव कोरण्यासाठी विदर्भाला दुसऱ्या डावात फक्त 29 धावांची गरज होती. चौथ्या दिवसाअखेर विदर्भानं एका गड्याच्या मोबदल्यात हे लक्ष पार केलं. विदर्भानं दिल्लीला पहिल्या डावात 295 आणि दुसऱ्या डावात 280 धावात रोखलं. विदर्भानं पहिल्या डावात 547 धावांचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या डावात विदर्भान एका गड्याच्या मोबदल्यात विजय मिळवला.
कर्नाटकसारख्या आठवेळा विजेता राहिलेल्या संघाला उपांत्य सामन्यात पराभूत करून थेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश, ही कामगिरी एकदम झळाळून उठते! अंतिम सामन्यात दिल्लीसंघाचा पराभव करत रणजी चषकाच्या इतिहासात आपलं नाव कोरलं आहे. विदर्भानं पहिल्या डावात दिल्लीला 295 धावांवर रोखलं. त्यानंतर कर्णधार फैज फजल 67, वसीम जाफर ७८, अक्षय वखरे 17, अक्षय वाडकर 133, आदित्य सरवटे ७९, सिद्धेश नेरळ खेळत आहे 74 यांच्या खेळीच्या बळावर पहिल्या डावांत 547 धावांचा डोंगर उभा केला. दमदार फलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावात विदर्भानं 252 धावांची आघाडी घेतली. विदर्भानं दुसऱ्या डावात दिल्लीला 280 धावांवर रोखलं.
आपल्या पहिल्या मोसमात पाचव्या सामन्यात खेळणारा यष्टिरक्षक वाडकर 133 धावांच्या बळावर सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ७ बाद ५२८ धावांची दमदार मजल मारली. सिद्धेश नेरळ ९२ चेंडूंना सामोरा जाताना ५६ धावा काढून वाडकरला साथ देत आहे. त्याने अर्धशतकी खेळीत चार षटकार व चार चौकार लगावले. वाडकर व नेरळ यांनी आठव्या विकेटसाठी आतापर्यंत ११३ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. दिल्लीचा पहिला डाव २९५ धावांत संपुष्टात आला. वाडकरने त्याआधी होळकर स्टेडियममध्ये आदित्य सरवटेसोबत सातव्या विकेटसाठी १६९ धावांची भागीदारी केली. सवरटेने १५४ चेंडूंना सामोरे जाताना ७९ धावा केल्या. विदर्भाने दुसऱ्या दिवसाच्या ४ बाद २०६ धावसंख्येवरून पुढे खेळताना तिसऱ्या दिवशी निर्धाराने फलंदाजी केली. विदर्भाने दिल्लीच्या सुमार क्षेत्ररक्षणाचा लाभ घेतला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतकडे विदर्भाच्या फलंदाजांना रोखण्याची कुठली रणनीती नव्हती. त्याने यष्टिचितची संधीही गमावली.
विदर्भाची कामगिरी -
याआधी विदर्भाने दोनदा उपांत्य फेरी गाठली होती. २००२-०३ आणि २०११-१२ या सत्रात दोनदा विदर्भ संघ उपांत्य फेरीत पोहोचला; पण स्पर्धा जिंकू शकला नव्हता. याशिवाय संघाने दोनदा उपांत्यपूर्व फेरीतही धडक दिली होती. १९७०-७१ मध्ये तसेच १९९५-९६ या सत्रात विदर्भ संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला होता.
Web Title: Vidarbha created history, named for the first time in the Ranji Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.