Ranji Trophy : विदर्भकराची कमाल! यश राठोडच्या नावे झाला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड

रणजीच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या यादीत तीन फलंदाज हे विदर्भ संघाच्या ताफ्यातील आहेत. इथं पहा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:59 IST2025-03-01T16:51:28+5:302025-03-01T16:59:54+5:30

whatsapp join usJoin us
Vidarbha vs Kerala Final With 944th Run Vidarbha's Yash Rathod Becomes Highest Run Getter In 2024-25 Ranji Trophy Season | Ranji Trophy : विदर्भकराची कमाल! यश राठोडच्या नावे झाला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड

Ranji Trophy : विदर्भकराची कमाल! यश राठोडच्या नावे झाला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Yash Rathod Becomes Highest Run Getter In 2024-25  Ranji Trophy Season : देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या २०२४-२५ च्या हंगामातील जेतेपदासाठी नागपूरच्या मैदानात विदर्भ आणि केरळ संघ मैदानात उतरले आहेत. एका बाजूला घरच्या मैदानातील विजयासह विदर्भ संघ तिसऱ्यांदा या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे  केरळ संघ पहिल्यांदाच फायनल खेळताना इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

करुण नायरच्या शतकाशिवाय विदर्भकडून यश राठोडनं साधला विक्रमी डाव

चौथ्या दिवसाच्या खेळात विदर्भ संघानं दुसऱ्या डावात करुण नायरच्या दमदार शतकाच्या जोरावर दुसऱ्या डावात २७५ हून अधिक धावांची आघाडी घेतलीये.  या सामन्यात यश राठोड फक्त ५६ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. पण या डावात त्याने यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थान पटकावले आहे. अंतिम सामन्यातील दुसऱ्या डावात वैयक्तिक ८ धावा करताच २०२४-२५ रणजी हंगामात ९४४ धावांसह त्याने शुभम शर्माला मागे टाकत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानावर कब्जा केला.

कशी राहिलीये यश राठोडची कामगिरी? 

 यश राठोड याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक ५ शतकासह  ५५. ५ पेक्षा अधिक सरासरीसह ९६० घाना केल्या आहेत.  यंदाच्या हंगामात १५१ ही त्याच्या यंदाच्या हंगामातील सर्वोच्च खेळी आहे. नागपूरच्या मैदानात मुंबई विरुद्धच्या लढतीत त्याने संघाला फायनलमध्ये घेऊन जाणारी दमदार खेळी केली होती. यंदाच्या हंगामात यश राठोडशिवाय करुण नायर आणि दानिश मलेवार हे विदर्भाचे दोन फलंदाज सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या आघाडीच्या पाच खेळाडूंच्या यादीत असल्याचे दिसून येते.

रणजी स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारे आघाडीचे ५ फलंदाज 

यश राठोड (विदर्भ) -९६० धावा
शुभम शर्मा (मध्य प्रदेश)९४३ धावा
तन्मय अग्रवाल (हैदराबाद) ९३४ धावा
करुण नायर (विदर्भ) ८३६ *
दानिश मलेवार (विदर्भ ) ७८३
 

Web Title: Vidarbha vs Kerala Final With 944th Run Vidarbha's Yash Rathod Becomes Highest Run Getter In 2024-25 Ranji Trophy Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.