Suryakumar Yadav 4 sixes Video, IND vs AUS Live Updates: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताच्या फलंदाजांनी पाहुण्यांची धुलाई केली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला पण तो फसला. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी द्विशतकी भागीदारी करत, संघाच्या मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. शुबमन गिलने १०४ तर श्रेयस अय्यरने १०५ धावा कुटल्या. हे दोघे बाद झाल्यावर राहुलने संयमी खेळी सुरू ठेवली. पण सूर्यकुमार यादवने मात्र आपल्या धुवाँधार खेळीची झलक दाखवून दिली. त्याने एका षटकात लगावलेल्या सलग चार षटकारांची चांगलीच चर्चा रंगली.
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन ग्रीनला गोलंदाजी दिल्यानंतर सूर्यकुमार यादवने त्याचा चांगलाच समाचार घेतला. ४४ वे षटक टाकण्यासाठी ग्रीन ला आला होता. त्यावेळी सूर्यकुमारने पहिले दोन चेंडू स्टंपच्या मागच्या दिशेने मारले. त्यानंतर ग्रीनने गोलंदाजीची लाइन बदलली तर सूर्याने ऑफसाइडला षटकार मारला. त्यानंतर पायात आलेल्या चौथ्या चेंडूवरही सूर्याने लेगसाईडला षटकार मारला.
सूर्या आज सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम करणार असे वाटत होते, पण तसे घडले नाही. पाचव्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली आणि नॉन स्ट्राईकवर आला.