Join us  

Video : RCBच्या नव्या भिडूनं शतकी खेळीनंतरही सामना गमावला, पाहा नेमकं काय झालं

ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट फलंदाजांची फौज असूनही विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला (RCB) इंडियन प्रीमिअर लीगमध्ये एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 5:13 PM

Open in App

ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट फलंदाजांची फौज असूनही विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला (RCB) इंडियन प्रीमिअर लीगमध्ये एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. पण, 2020च्या आयपीएल मोसमासाठी RCB आपल्या ताफ्यात नव्या खेळाडूंना सामील करून घेतले आहे. असाच एका नव्या भिडूनं शनिवारी बिग बॅश लीगमध्ये शतकी खेळी केली. पण, त्याच्या या खेळीनंतरही मेलबर्न रेनेगॅड्स संघाला पराभव पत्करावा लागला. सिडनी सिक्सर्स संघानं 7 विकेट्स व 8 चेंडू राखून हा सामना जिंकला आणि त्या फलंदाजाची स्फोटक खेळी व्यर्थ ठरली.

इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावात RCBनं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. आयपीएलच्या इतिहासात आठ विविध संघांकडून खेळणारा फिंच हा पहिलाच खेळाडू ठरला. भारताविरुद्धच्या मालिकेतील अपयशानंतर मायदेशी परतलेल्या फिंचनं बिग बॅश लीगमध्ये तुफान फटकेबाजी केली. मेलबर्न रेनेगॅड्स संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं शनिवारी शतकी खेळी केली. बिग बॅश लीगमधील त्याचे हे तिसरे शतक ठरले, परंतु प्रतिस्पर्धी सिडनी सिक्सर्सनं त्याच्या आनंदावर पाणी फिरवले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या मेलबर्न संघानं 5 बाद 175 धावा केल्या. त्यात फिंचच्या 109 धावांचा समावेश होता. अन्य फलंदाजांनी निराश केले. फिंचनं 68 चेंडूंत 6 चौकार व 7 षटकार खेचून 109 धावांची खेळी केली. अन्य फलंदाज टॉम कुरणच्या गोलंदाजीवर ढेपाळले. त्यामुळे मेलबर्न संघाला 175 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्सकडून जोश फिलीप आणि स्टीव्ह स्मिथ यांनी अर्धशतक झळकावलं. फिलीपनं 43 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचून 61, तर स्मिथनं 40 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 66 * धावा केल्या. सिडनी सिक्सर्सनी हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला.

टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार!

IND Vs NZ : टीम इंडिया अन् न्यूझीलंड यांनी मिळून घडवला विश्वविक्रम, ट्वेंटी-20त प्रथमच घडला पराक्रम

...तर धोनी IPL नंतर 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल; शास्त्रीबुवांचं सूचक विधान

बाबो, या संघानं पटकावला कसोटीत 5 लाख धावा करण्याचा पहिला मान

IND vs NZ : जसप्रीत बुमराहला दुखापत, टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात बसू शकतो धक्का?

BCCIनं सेंट्रल काँट्रॅक्ट नाकारलं, पण उत्पन्नाची 'हे' सात स्रोत धोनीला करतात मालामाल

Video: डिव्हिलियर्सची चौकार-षटकारांची आतषबाजी, 191.89 च्या स्ट्राईक रेटनं धु धु धुतले

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा BCCIला इशारा, टीम इंडिया आशिया कपमध्ये न खेळल्यास...

टॅग्स :अ‍ॅरॉन फिंचरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरटी-20 क्रिकेटस्टीव्हन स्मिथ