आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाकडून कमबॅक करण्यासाठी उत्सुक असलेल्या एबी डिव्हिलियर्सनं शनिवारी बिग बॅश लीगमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्यानं टोलावलेल्या उत्तुंग षटकारांनी क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. डिव्हिलियर्सनं केलेल्या तुफान फटकेबाजीनं ब्रिस्बन हिट संघानं 20 षटकांत 5 बाद 186 धावा केल्या.
सॅम हिझलेट ( 18) आणि बेन कटींग ( 22) हे सलामीवीर झटपट माघारी परतल्यानंतर ख्रिस लीन आणि डिव्हिलियर्स यांनी मेलबर्न स्टार्स संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पण, 33 धावांची भागीदारी करून लीन माघारी परतला. कर्णधार लीननं 31 चेंडूंत 34 धावा केल्या. त्यानंतर डिव्हिलियर्स व मार्नस लाबुशेन यांची फटकेबाजी पाहायला मिळाली. डिव्हिलियर्सनं सामन्याची सूत्रे हाती घेत मेलबर्न स्टार्सच्या गोलंदाजांना हतबल केले. डिव्हिलियर्सनं 37 चेंडूंत 191.89 च्या स्ट्राईक रेटनं 2 चौकार व 6 षटकार खेचून 71 धावा केल्या. लाबुशेन 13 चेंडूंत 24 धावांवर नाबाद राहिला.
IND Vs NZ : टीम इंडिया अन् न्यूझीलंड यांनी मिळून घडवला विश्वविक्रम, ट्वेंटी-20त प्रथमच घडला पराक्रम
...तर धोनी IPL नंतर 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल; शास्त्रीबुवांचं सूचक विधान
बाबो, या संघानं पटकावला कसोटीत 5 लाख धावा करण्याचा पहिला मान
IND vs NZ : जसप्रीत बुमराहला दुखापत, टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात बसू शकतो धक्का?
BCCIनं सेंट्रल काँट्रॅक्ट नाकारलं, पण उत्पन्नाची 'हे' सात स्रोत धोनीला करतात मालामाल