Join us  

Video : एबी डी'व्हिलियर्सचा हा अविश्वसनीय 'switch-hit' पाहून व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज एबी डी'व्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तर व्यावसायिक ट्वेंटी-20 लीगमध्ये त्याची फटकेबाजी सुरूच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 11:42 AM

Open in App
ठळक मुद्देएबी डी'व्हिलियर्सची व्यावसायिक ट्वेंटी-20 लीगमध्ये फटकेबाजी30 चेंडूंत चोपल्या 59 धावा, तरीही संघ पराभूतपण, त्याच्या स्विच हिटने चाहते अवाक्

मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज एबी डी'व्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तर व्यावसायिक ट्वेंटी-20 लीगमध्ये त्याची फटकेबाजी सुरूच आहे. विचित्र पण अचुक फटक्यांनी प्रतिस्पर्धी संघाला आवाक् करणारा आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या एबी सध्या मॅझन्सी सुपर लीगमध्ये धुमाकुळ घालत आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याने आपल्या विशेष शैलीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. तोच करिष्मा सुपर लीगमध्ये सुरू आहे. रविवारी त्याने अविश्वसनीय  'switch-hit' मारून चाहत्यांचे मनोरंजन केले.

टीश्वाने स्पार्टन्स क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एबीने केप टाऊन ब्लिट्झ संघाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. त्याने 30 चेंडूंत 59 धावा चोपल्या. Mr 360 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबीने 11 व्या षटकात मारलेला स्विच हिट सर्वांचे लक्ष वेधून गेला. पाहा व्हिडीओ... एबीच्या फटकेबाजीनंतरही स्पार्टन्स संघाला 181 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. कायरे व्हेरेयने (53) आणि मोहम्मद नवाज ( 59) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर केप टाऊन ब्लिट्झ संघाने 4 बाद 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या स्पार्टन्सला 49 धावांनी पराभव पत्करावा लागला. 

टॅग्स :एबी डिव्हिलियर्स